Old school days video: शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. आज १५ जून शाळेचा पहिला दिवस, कुणी पहिल्यांदाच या नवीन विश्वात आज प्रवेश करेल तर कुणी मोठ्या सु्ट्टीनंतर आज पुन्हा शाळेत जाईल. अशाच पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या काही चिमुकल्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्याच्या कडा पाणावतील.
उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेतील आठवणी काही खास असतात. शाळेचा पहिला दिवस म्हणजे कोऱ्या पुस्तकांचा वास, शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवे शिक्षक, नवे मित्र मैत्रीणी, नवा वर्ग. मात्र जे पहिल्यांदाच या वास्तूमध्ये पाऊल ठेवतात त्यांना मात्र हे सगळं फारच नवीन असतं. नवीन इयत्ता, नवे शिक्षक आणि पालकांना सोडून पुन्हा शाळेत जाताना चिमुरडे हमसून हमसून रडत आहेत. तर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या भीतीने गोळा आला आहे. त्याच वेळी दीर्घ सुट्टीनंतर जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेतील आठवणी काही खास असतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> झोका घेण्याच्या नादात पठ्ठ्यानं अख्खं झाड अंगावर घेतलं; तरुणाचा ‘हा’ VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
शाळा… कुणाच्या आयुष्यातील स्वप्नवत काळ तर कुणासाठी खडतर प्रवास… कुणासाठी आयुष्याच्या सुंदर इमारतीची पायाभरणी तर कुणासाठी भुसभुशीत जमीन. शालेय जीवनाचा काळ खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार देणारा. ते वयही तितकंच अवखळ. त्यामुळेच या वयात घडणाऱ्या गमतीजमती, आठवणीत मनात कायमच्या कोरल्या जातात. आयुष्याच्या या अद्भुत काळाचा ठेवा मनात रुतून राहतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कायम ताजे राहणारे हे क्षण पुन्हा कधीच येत नाहीत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर shareef_master_bavanagar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून नेटकरीही व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.