कॅनडामधील २४ वर्षीय मॉडेल कॅट गलिंगर ही गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. ‘स्किरा टॅटू’ डोळ्यात काढून तिने आपली दृष्टी गमावली होती. या प्रकारात डोळ्यातील पांढरा भाग विविध रंगाच्या शाईने रंगवण्यात येतो. कॅटलादेखील अशाच प्रकारे डोळ्यांतील आतील भाग रंगवून घ्यायचा होता. पण आठवड्याभरातच तिला याची मोठी किंमत मोजावी लागली. कारण शाईमुळे तिच्या डोळ्याला सूज आली. इतकंच नाही तर तिच्या डोळ्यातून जांभळ्या रंगाचे पाणी येऊ लागले. यामुळे तिच्या डोळ्याची दृष्टी अंधुक झाली. हे प्रकरण ताजं असताना दिल्लीतील एका टॅटू आर्टिस्टनं आपल्या डोळयात टॅट्यू काढून घेतला आहे.

वाचा : १५९ तासांचा ओव्हरटाईम केल्याने महिला पत्रकाराचा मृत्यू

डोळ्याच्या आतील भागात टॅटू काढून घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. करण किंग असं त्यांचं नाव असून तो मुळचा दिल्लीचा आहे. डोळ्यातील अतील भाग रंगवून घेण्याची त्याची इच्छा होती. याचे दुष्परिणाम देखील त्याला ठावूक होते. तरीही त्याने आपल्या डोळ्यात ‘स्किरा टॅटू’ काढून घेतला. ‘ स्किरा टॅटू काढून घेणं डोळ्यांसाठी हानिकारक आहे याची मला कल्पना आहे. यामुळे माझी दृष्टी देखील जाऊ शकते. पण मला याची पर्वा नाही. या टॅटूबद्दल सखोल माहिती जाणून घेतल्यानंतरच मी डोळ्यात टॅटू काढून घेतला.’ अशी प्रतिक्रीया त्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.

वाचा : गावकऱ्यांनी चक्क भलामोठा अजगर तळून खाल्ला!

‘स्किरा टॅटू’चा नवा ट्रेंड हळूहळू फॅशन विश्वात रुजत आहे. अशाप्रकारे डोळ्यातून आताला भाग रंगवून घेणं ‘फॅशनेबल’, ‘मॉर्डन’, ‘कूल’ समजलं जातं. हा ट्रेंड आल्यापासून दृष्टी गमावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. टॅटू काढल्यानंतर योग्य ती काळजी न घेतल्याने डोळ्यांना इजा झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. तरीही तरुणांमधल्या या टॅटूची क्रेझ काही कमी झाली नाही.

१९७१ मधील किराणा मालाचे दर पाहिले तर तुम्हीही अवाक् व्हाल!

Story img Loader