तृतीयपंथियांना कमी लेखावं, त्यांचा तिरस्कार करावा असं कुठेही लिहिलेलं नाही. पण तरीही आपल्या समाजात आणि आणि परदेशांमध्येही तृतीयपंथीयांना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांना नोकरीवर घ्यायला टाळाटाळ केली जाते. सगळीकडे त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. त्यांना समाजामध्ये चांगल्या राहणीमानाची नोकरी किंवा व्यवसाय करता येत नाही.

पण आता या प्रश्नावरच्या जागृतीमुळे परिस्थिती बदलते आहे. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो आहे त्याचमध्ये आपणही चांगंल आयुष्य जगू शकतो असा आत्मविश्वास या समाजामध्ये निर्माण होतो आहे.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
Rajender Meghwar Pakistans first Hindu cop
पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी; कोण आहेत राजेंद्र मेघवार?
pune pmc On first day of Sarvankash Swachhta 24 tons of garbage and billboards removed
महापालिका आयुक्तांचा आदेश आणि पहिल्याच दिवशी झाले इतके काम ! महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम, १६ टन राडारोडा, २४ टन कचराही उचलला
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!

या लेखाच्या सुरूवातीला दिलेला फोटो आहे के. प्रीतिका यशिनीचा प्रीतिका तृतीयपंथी आहेत. आणि त्यांनी जिद्दीने स्वत:च्या कष्टांच्या बळावर पोलीस सबइन्स्पेक्टरची नोकरी मिळवली आहे. प्रीतिका देशातल्या पहिल्या तृतीयपंथी सब-इन्स्पेक्टर ठरल्या आहेत. त्यांनी तामिळनाडूच्या पोलीस अकादमीमध्ये या पदासाठी एक वर्षाच्या अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या अभ्यासक्रमाच्या परिक्षेला बसण्यासाठीही प्रीतिकांना प्रचंड झगडा करावा लागला. तृतीयपंथी व्यक्तींना या परीक्षेला बसण्याच्या मार्गात अनेक अडथळे होते. हे सगळे अडथळे प्रीतिकाने कायदेशीर लढाई लढत तसंच बऱ्याच जणांशी पाठपुरावा करत दूर केले आणि आपली ओळख न लपवता या परिक्षेमध्ये प्रीतिकांनी यश मिळवलं.

तामिळनाडू पोलीस अॅकॅडमीमध्ये त्यांना सहकार्य मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. तामिळनाडूच्या पोलीस दलामध्ये नव्याने सामील होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची पासिंग आऊट परेड नुकतीच पार पडली. यावेळी या परेडमध्ये प्रीतिकाही सहभागी झाल्या होत्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीसामी हे या परेडच्या वेळी उपस्थित होते पोलिस हे जनतेचे मित्र आणि संरक्षक असतात. त्यामुळे पोलिसांनी कशाचीही भीती न बाळगता आपलं कर्तव्य पार पाडावं असा संदेश त्यांनी पोलिसांना दिला.

Story img Loader