अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प US President Donald Trump हे या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतात. आता चर्चेत यायला त्यांनी काय केलं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहा! पोलंडच्या फर्स्ट लेडींनी त्यांचा जो काही ‘पचका’ केलाय ना! तो ते कधी विसणार नाहीत हे खरं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे पोलंडमध्ये आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पोलंडचे राष्ट्रध्यक्ष सपत्नीक तिथे उपस्थित होते. आता आपल्याकडे एखाद्याचं स्वागत करताना आपण वाकून नमस्कार वगैरे करतो. पण तिथे हस्तांदोलन करण्याची पद्धत आहे. तेव्हा ट्रम्प दामंपत्यांचं राष्ट्राध्यक्षांनी हस्तांदोलन करत स्वागत केलं. स्वागत करण्याची नंतर वेळ आली ती पोलंडच्या फर्स्ट लेडी अँगाटा Polish First Lady Agata Kornhauser-Duda यांची. जेव्हा ट्रम्प यांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत त्या मेलानिया यांच्याकडे हस्तांदोलन करण्याकरता पुढे सरसावल्या. त्यांच्या अशा अनपेक्षित वागण्याने ट्रम्प यांचा चेहऱ्याचा पार रंगच उडाला. आता हा प्रकार कॅमेरात कैद झाला नाही तर नवलंच, तेव्हा याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : त्यांच्या ‘त्या’ एकच आठवणीवर आयुष्य जगते आहे; शहीद जवानाच्या पत्नीची हृदयस्पर्शी पोस्ट

तसं डोनाल्ड ट्रम्प यांची हस्तांदोलन करण्याची पद्धत जरा विचित्र आहे. यावर अनेकदा तिथल्या वर्तमान पत्रात बातम्या छापून आल्या होत्या. आता कदाचित ते वाचून घाबरून वगैरे अँगाटा मॅडमने हस्तांदोलन करणं टाळलं की काय कोण जाणे. पण जे काही असो सोशल मीडियावर मात्र याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

वाचा : मुलीला कबरीत घेऊन झोपणारा ‘बाप’माणूस