ब्रिटनमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीमध्ये मजूर पक्षाने (लेबर पार्टी)वर विजय मिळवत तब्बल १४ वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले मजूर पक्षाचे कीर स्टार्मर आता पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान यूकेच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने नुकतेच प्रिन्स नावाच्या सायबेरियन मांजरीचे स्वागत केले आहे जे युकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर (Keir Starmer’s) यांच्या कुटुंबातील नवा सदस्य आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या कार्यालयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये, “हे पांढऱ्या रंगाचे मांजराचे पिल्लू पंतप्रधानांच्या डेस्कवर बसलेले दिसते आहे, त्याचे पंजे टेबलावरील कागदावर आहेत. मांजर एक टक पाहताना अगदी गोंडस दिसत आहे.” फोटो शेअर केल्यापासून सोशल मीडियावर सध्या पंतप्रधानांच्या मांजरीचंही कौतुक होत आहे.

१० डाउनिंग स्ट्रीट, हे युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय आहे. लंडनमध्ये स्थित, हे १७३५ पासून पंतप्रधानांचे घर आहे. १० डाऊनिंग स्ट्रीटमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येक पंतप्रधानांना त्यांच्या कुटुंबातील पाळीव प्राणी लंडनमधील त्यांच्या अधिकृत घरात आणण्याची परवानगी असते. दरम्यान पंतप्रधान स्टार्मर यांच्या कुटुंबातील नव्या सदस्याचे १० डाउनिंग स्ट्रीट येथे नुकतेच आगमन झाले आहे.

…म्हणून पंतप्रधानांनी नव्या मांजराचे कुटुंबाचे सदस्य बनवले

पंतप्रधानांच्या निवासस्थानी नवीन मांजराच्या आगमनाची घोषणा करताना, स्टारर्म म्हणाले की, “अधिकृत पंतप्रधानांच्या घरी स्थायिक झाल्यानंतर पाळीव प्राणी म्हणून कुत्रा घ्यायचा या मतावर माझी मुलं ठाम होती पण मुलांबरोबर खूप काळ चर्चा केल्यानंतर त्यांनी कुटुंबातील नवीन पाळीव प्राणी म्हणून प्रिन्स मांजराला स्वीकारण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलांसाठी एका मोठी गोष्ट आहे आणि प्रिन्स मांजराला स्वीकारणे हा आमच्यातील एक करार होता.”

एक नव्हे तीन मांजरी आहेत डाऊनिंग स्ट्रीट कार्यालयात

प्रिन्स आता डाऊनिंग स्ट्रीट कार्यालयात राहणारी तिसरी मांजर आहे कारण स्टार्मर यांच्या कुटुंबाकडे आधीपासून एक मांजर आहे ज्याची नाव जोजो असे आहे. या दोघांव्यतिरिक्त ‘लॅरी द कॅट’ या इंटरनेट सेलिब्रिटी आणि डाउनिंग स्ट्रीट येथे “चीफ माऊसर” हिचे देखील घर आहे.

हेही वाचा –जंगलात हरवलेलं मांजर १२८८ किलोमीटर प्रवास करून परतलं घरी! वाचा, नक्की काय घडलं?

लॅरी मांजराचे काय होणार? (What happens to Larry the cat?

लॅरी जगातील सर्वात प्रसिद्ध मांजरीपैकी एक मांजर आहे जी १० डाउनिंग स्ट्रीट येथे २०११ पासून येथे राहत आहे. लॅरीची देखभाल १० डाउनिंग स्ट्रीट कर्मचारी करतात. लॅरी ही मांजर पंतप्रधानांच्या घरात राहणाऱ्या सर्वात जास्त काळ राहणाऱ्यांपैकी एक आहे. गेल्या १४ वर्षात, पाच पंतप्रधान आले आणि गेले पण लॅरी ती अजूनही तिथेच राहत आहे. अनेकदा चीफ माऊसर म्हणून लॅरी अनेकदा सोशल मीडियावर प्रशंसा मिळवतो.

प्रिन्सच्या पंतप्रधानांच्या घरी आगमन झाल्याने लॅरीबाबत काही अफवा पसरल्या होत्या. वय वाढत असल्याने भविष्यात लॅरी मांजराचे निधन होऊ शकते म्हणून नवीन मांजर आणल्याची चर्चा सुरु आहे. तसेच डाउनिंग स्ट्रीटने मांजराच्या मृत्यूची घोषणा करण्यासाठी आधीच पुढची योजना आखण्यात आली आहे अशीही चर्चा रंगली होती.

पण लॅरी अजूनही आपली भूमिका सोडायला तयार नाही हे तिने दाखवून दिले. यूकेच्या पंतप्रधानांच्या प्रिन्सबरोबरच्या फोटोला उत्तर देताना, लॅरी द कॅटच्या एक्स अकाउंटवर “डाउनिंग स्ट्रीटवर सर्वोत्तम दिसणारी मांजर म्हणून माझी जागा आव्हानात्मक राहणार आहे,”अशी पोस्ट शेअर केली आहे.