आधुनिक तंत्राज्ञानाने सज्ज असलेले सिंगापूर जगात अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. फार कमी कालावधीत सिंगापूरने प्रगती केली. अनेक परदेशी पर्यटकांची पसंती या शहराला आहे. याचवर्षी जगातील महागड्या शहरांच्या यादीत सिंगापूरचे नाव असल्याने हे शहर चांगलेच चर्चेत होते. पण पुन्हा एकदा हे शहर चर्चेत आले आहे. कारण नवीन वर्षात सिंगापूरमध्ये विनाचालक बस धावणार आहे. २०१७ मध्ये पहिल्या तीन महिन्यात ही विनाचालक बस धावणार आहे. १५ प्रवशांची क्षमता असलेली ही बस सुरूवातीला दीड किलोमीटर पर्यंत अंतर कापणार असल्याचे समजते.

वाचा : बर्फातून वाहणा-या रक्ताच्या धबधब्याचे रहस्य तरी काय?

‘आर्मा’ म्हणून ओळखली जाणारी ही बस २०१७ मध्ये सिंगापूरच्या रस्त्यावर धावणार आहे. विनाचालक धावणारी ही बस वीजेवर चालणार आहे. तसेच या बसमध्ये बॅटरी देखील आहे तिचा वापर करून अर्धा दिवस ही बस प्रवास करू शकते. या बसमध्ये सेन्सॉर बसवण्यात आले आहे, ज्यामुळे मार्गात येणार अडथळा ही बस सहज ओळखू शकते. जीपीएस सुविधाने युक्त अशा या बसमध्ये कॅमेरा देखील बसवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या आसपास सिंगापूरच्या रस्त्यावर ‘नुटोनोमी’ कंपनीने विनाचालक टॅक्सी उतरवल्या होत्या. २०१८ पर्यंत संपूर्ण सिंगापूर शहरातच विनाचालक टॅक्सी उतरवण्याचा या कंपनीचा मानस आहे. पण विनाचालक बस धावणारे सिंगापूर हे काही पहिले शहर नाही. याआधी जून महिन्यात नेदरलँडच्या रस्त्यावर विनाचालक बस धावली होती. मर्सडिज कंपनीने ही बस तयार केली आहे.

Story img Loader