काल रात्री टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव केला, तर या सामन्यात डेव्हिड वॉर्नरची बॅट जोरदार धावली आणि तो आपल्या जुन्या शैलीत दिसला. पण या सामन्यानंतर वॉर्नरची आणखी एक अनोखी शैली पाहायला मिळाली, ज्यामुळे तो खूप चर्चेत आहे. आता या डॅशिंग फलंदाजाचा संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय झालं नक्की?

डेव्हिड वॉर्नरच्या शानदार खेळाची सर्व चाहते वाट पाहत होते आणि लंकेविरुद्ध खेळलेल्या या खेळीने त्याच्या चाहत्यांनाही मोठा दिलासा दिला. आयपीएलमध्‍ये या फलंदाजासोबत जे काही घडले, ते तो विसरला आणि ऑस्ट्रेलियाकडून खेळताना डेव्हिडने संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान वॉर्नरचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला, ज्यामध्ये तो क्रिस्टियानो रोनाल्डोची कॉपी करताना दिसत आहे.

( हे ही वाचा: डिझायनर सब्यसाचीच्या मंगळसूत्राच्या नवीन जाहिरातीवर लोक संतापले, म्हणाले “मंगळसूत्र आणि कामसूत्र…” )

काय आहे व्हिडीओमध्ये?

पत्रकार परिषदेला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने शीतपेयाची (कोकची) बाटली काढली.

वॉर्नरने ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणेच करण्याचा प्रयत्न केला.

पण हा धडाकेबाज फलंदाज फक्त विनोद करत होता.

त्याचवेळी, शानदार खेळीनंतर आता वॉर्नरची ही शैली चाहत्यांना पसंत पडली.

( हे ही वाचा: पाकिस्तानमध्ये भररस्त्यात शहामृगाची गाड्यांशी शर्यत! व्हिडीओ व्हायरल )

ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

२०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच दिसत आहे, तसेच लंकेला नमवून संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. प्रथम खेळताना श्रीलंकेने चांगली सुरुवात केली, मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी माघारी येऊन लंकेच्या संघाला १५४ धावांत रोखले. त्यानंतर फलंदाजीत वॉर्नरच्या तुफानी खेळीने संघाला पुढे आणले,त्याचबरोबर उर्वरित फलंदाजांच्या डावानेही संघाच्या विजयात महत्त्वाची भागीदारी केली आणि संघाने स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. त्याचबरोबर श्रीलंकेचा हा पहिलाच पराभव आहे, याआधी संघाने १ सामना जिंकला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First ronaldo and now david warner the same thing happened again video storm goes viral ttg