Fish Came To Meet Dog On Riverside Video Viral : पाळीव प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी अनेक माणसं आहेत. त्या प्राण्यांशी प्रेमळ संवाद साधून त्यांच्या आवडीच्या गोष्टी जाणून घेणे प्रत्येकालाच जमेल असं नाही. हे तर माणसांचं झालं. पण एका व्हायरल व्हिडीओने अनेकांचा चकीत केलं आहे. कारण नदी किनाऱ्यावर गेलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला भेटण्यासाठी मासा चक्क किनाऱ्यावर आला आणि त्याच्यासोबत बागडू लागला. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल आणि नक्कीच म्हणाल की, खरंच माशालाही भावना असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणत्याही प्रकारचा आवाज आला किंवा आजूबाजूला हालचाल झाली की, मासे खोल पाण्यात डुबकी मारून तळ गाठतात. पण या माशाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण मासा किनाऱ्यावर येऊन कुत्र्याच्या पिल्लाला चक्क चुंबन घेतो आणि पाण्यात निघून जातो. हा जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. @earthdixe नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर कुत्र्याच्या पिल्लाचा आणि माशाचा हा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

नक्की वाचा – सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीवर यशराज मुखाटेनं बनवलं गाणं! भन्नाट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

इथे पाहा कुत्र्याच्या आणि माशाचा क्यूट व्हिडीओ

व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, सुंदर प्राणी..तुमचा कोणता फेव्हरेट आहे? हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून आतापर्यंत १ लाख ७० हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, कुत्र्याचं पिल्लू नकी किनाऱ्यावर शांत बसलेलं असतं. त्याचदरम्यान पाण्यातून एक मोठा मासा येतो आणि कुत्र्याजवळ जातो.

विशेष म्हणजे तो मासा कुत्र्याला चुंबन घेतो आणि कुत्राही त्याच्या पाठीवर बसून ऐटीत उभा राहतो. दोघांमधील प्रेमळ संवाद पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण प्राण्यांनाही प्रेमभावना असतात आणि ते किती सुंदर आयुष्य जगतात. हेच या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं की, मित्राल्या भेटण्यासाठी मासा कंफर्ट झोनच्या बाहेर आला. अन्य यूजर म्हणाला, दोन मित्रांचं सुंदर गेट टुगेदर.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fish came to meet dog at riverside big fish and puppy unbelievable video clip viral on instagram people shocked nss
Show comments