असं कोणतंचं क्षेत्र नाही की ज्यात महिला आघाडीवर नाहीत. तिनेसुद्धा आपल्या जिद्दिने एक नाही तर पाच शिखर सर करून तिला कोणीही अडवू शकत नाही हे दाखवून दिले आहे. २३ वर्षांची सबिता महतो एका मच्छीमाराची मुलगी. घरची परिस्थिती तशी बेताचीच पण यावर मात करत तिने आपले स्वप्न जपलं. ५ हजार मीटर उंचीचे जगातले पाच शिखर सर करून तिने सा-या जगांचे लक्ष वेधले आहे.

अशक्य अशी गोष्ट तिने साध्य करून दाखवली. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या सबिताला अनेक अडचणी आल्यात. वडिलांनी तर गिर्यारोहण करायला तिला ठाम नकार दिला. पण तिच्यातली जिद्द तिला काही स्वस्थ बसू देईनाच. अखेर प्रयत्नाने वडिलांना मनवण्यात ती यशस्वी झाली. एके दिवशी आपल्या मुलीला टेकडी चढताना पाहून वडिलांना फारच कौतुक वाटले आणि तिच्या मार्गातली अडचण आपसूकच दूर झाली. नुकतेच उत्तराखंडमधले दोन, लढाकमधले दोन आणि आंध्रप्रदेशमधले एक असे पाच हजार मीटर उंचीचे पाच शिखर सर करून तिने सगळ्यांनाच थक्क करून सोडले.

वाचा : देशातली पहिली तृतीयपंथी पोलीस उपनिरीक्षकाची प्रेरणादायी कहाणी

तिला आता माऊंट एव्हरेस्ट खुणावतो आहे. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा बोलून दाखवली. पण आर्थिक परिस्थिती तिच्या मार्गातला अडथळा बनत आहे. आपल्याला एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रयोजकाची मदत मिळते आहे का याचा शोध ती घेत आहे. एव्हरेस्ट मोहिमेसाठी जवळपास २५ लाख खर्च येणार आहे आणि तो आपल्याला परवडणार नाही असेही तिने सांगितले पण आपल्याला नक्कीच मदत मिळेल अशी आशा तिला आहे. एव्हरेस्ट सर केल्यानंतर खाली उतरताना काही गिर्यारोहक नेहमी शॉर्टकट मार्ग अवलंबतात पण आपण मात्र ज्या रस्त्याने एव्हरेस्ट रस केला आहे त्याच मार्गाने खाली उतरणार असल्याचा मानसही तिने बोलून दाखवला.

Story img Loader