Viral video: दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल मित्रा जिंकलस! आता मित्र हे फक्त माणसांचेच नसतात तर मित्र हे प्राण्यांचेही असतात. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे, याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि म्हणाल मित्र असावा तर असा.

प्राण्यांमध्ये मैत्री आणि प्रेम असणं ही एक आश्चर्यकारक बाब आहे. सारख्या प्रजातीचे प्राणी एकमेकांचे मित्र असतात तर अनेकदा वेगवेगळ्या जातीच्या प्राण्यांमध्ये मैत्री दिसून येते. ज्यामुळे त्यांचे संबंध अधिक खास बनतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मासा पाण्यातून बाहेर उड्या मारताना नेमका साप त्याच्यावर हल्ला करतो आणि शिकार करण्यासाठी माशाला आपल्या तोंडात पकडतो. यावेळी मासा सापाच्या तावडीतून सटण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. हे सगळं माशाचा मित्र पाण्यातून पाहतो आणि पाण्यातून बाहेर उडी मारत सापच्या तावडीत सापडलेल्या माशाला खाली पाण्यात खेचतो. अशाप्रकारे साप मृत्यूच्या दारातून परत येतो.

पाहा व्हिडीओ

https://twitter.com/Poojab1177/status/1909912348233498788

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओला माशाला “फांदीची फळे आणि फुले चाखण्याची सवय होती.
एके दिवशी मासा उडी मारत असतानाच फांदीवर एक साप होता.
यावेळी मासा पकडला गेला, त्याचा जीव धोक्यात आला.
यावेळी त्याच्या मित्राने माशाला पाहिले आणि वेळीच त्याला वाचवले. आयुष्यात असे मित्र असणे खूप महत्वाचे आहे.” असं कॅप्शन देण्यात आलंय. यावेळी नेटकऱ्यांनीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रया दिल्या आहेत. आयुष्यात मित्र असणं खूप महत्त्वाचं आहे अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर आणखी एकानं, खूप सुंदर अशी प्रतिक्रिया दिली आहे.