जगातील सर्वात मोठ्या गोल्ड फिशपैकी एक समजला जाणारा ३१ किलोचा मासा एका मच्छीमाराला मासेमारी करताना पाण्यात सापडला. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका मच्छीमाराने हा गोल्ड फिश शर्थीचे प्रयत्न करुन पाण्यात शोधला. जवळपास २० वर्षांपूर्वी हा गोल्ड फिश पाण्यात सोडण्यात आला होता. गोल्ड फिश समुद्रात किंवा तलावाच्या पाण्यात क्वचितच आढळतो. त्यामुळे याला जादुई गोल्ड फिश असं म्हटलं जातं. एका मच्छीमाराने नारंगी रंगाचा गोल्ड फिश पकडला. २० वर्षांपूर्वी या माशाला पाण्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर हा मासा पाण्यात क्वचितच दिसायचा. एका फिशरी मॅनेजरने सांगितलं की, या गोल्ड फिशचं आरोग्य आजही ठणठणीत आहे. हा मासा जगातील सर्वात मोठ्या गोल्ड फिशपैकी एक आहे, असा दावा केला जात आहे.
या माशाला पकडण्यासाठी एंडी हैकेटने जवळपास २५ मिनिटं पाण्यात शोध घेतला. कॅरट नावाच्या या गोल्ड फिशला पकडल्यानंतर पुन्हा त्याला पाण्यात सोडण्यात आलं. हायब्रिड प्रजातीचा हा मासा खूप आकर्षक आहे. डेली मेल ने दिलेल्या माहितीनुसार, कॅरटला २० वर्षांपूर्वी जेसन काउलरने पाण्यात सोडलं होतं. फिशरी मॅनेजर जेसनने म्हटलं की, या माशाचं आरोग्य आजही उत्तम आहे. एंडीने गोल्ड फिश पकडल्यामुळं आम्ही त्याला शुभेच्छा देत आहोत. हा मासा सर्वात वेगळा आहे.
हा गोल्ड फिश पाण्यात क्वचितच लोकांना दिसतो. एंडी हॅकेटनं ३१ किलोचा गोल्ड फिश पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. २०१९ मध्ये जेसन फुगेटनं अमेरिकेच्या मिनोस्टामध्ये असाच एक मासा पकडला होता. पण त्यांचं वजन १८ किलो होतं. एंडीने म्हटलं की, मला या गोल्ड फिशबाबत माहिती होती की, हा मासा फ्रांसमध्ये ब्लूवॉटर लेक्समध्ये उपलब्ध आहे. पण मी या गोल्ड फिशला पकडेल, असं मला कधी वाटलं नव्हतं. दरम्यान, एंडीने हा मासा पकडल्यानंतर त्याच्यासोबत फोटोही काढले आणि त्यानंतर त्याने या माशाला सुरक्षितपणे पाण्यात सोडलं.