Fisherman Viral Video: समुद्राला ललकारू नये, पाण्याशी खेळू नये अशी वाक्य आपण अनेकदा थोरामोठ्यांकडून ऐकली असतील. सोशल मीडियावर यापूर्वी समुद्राची विक्राळ रूपं अनेकदा व्हायरल झाली आहेत आणि त्यावरून हे थोरांचे बोल किती खरे आहेत याचा अंदाज आपण बांधू शकता. डिवचायला गेलं की भयंकर रूप धारण करणारा हाच समुद्र लाखोंचा पोषणकर्ता सुद्धा आहे. मच्छीमार समुदायातील लोक याच समुद्राची देवासारखी पूजा करतात आणि आम्हाला सांभाळून घे अशी प्रार्थना करून भल्या मोठ्या समुद्रात नाव घेऊन जातात. जीवाची पर्वा न करता विश्वासाच्या बळावर केली जाणारी ही मासेमारी खरोखरच एक कसब आहे. एका मच्छीमाराच्या याच शौर्याचे उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर @thenkadalmeenavan या अकाउंटवर अँटोनी शाबू या युजरने मासेमारी करायला निघालेल्या एका बोटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच अंगावर शहारा कायम राहतो. तुम्ही बघू शकता की, मोठमोठ्या लाटांनी चहुबाजूने वेढलेल्या बोटीत एक भलं मोठं जाळं ठेवलेलं आहे. काही सेकंदांनी बोटीच्या टोकाला उभा असलेला एक तरुण जाळ्याचं एक टोक घेऊन समुद्रात उडी मारतो. हळू हळू करून तुफान वेगाने हे जाळं बोटीतून बाहेर जाऊ लागतं. बोटीच्या मध्यभागी असणारे त्याचे सहकारी त्याला जाळं मोकळं करून देऊ लागतात.

मासेमारांचा हा Video पाहून अंगावर येईल काटा

हे ही वाचा<< मुकेश अंबानींना भरगर्दीत एकाने अशी हाक मारली की लोक बघतच राहिले; अंबानींच्या लक्षात येताच त्यांनी जे केलं..

सुमारे ४ लाख ३६ हजाराहून अधिक लाईक्स असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट करून हे लोक किती साहसी आहेत व पोटापाण्यासाठी माणसाला काय काय करावे लागते असे म्हणत आहेत. काहींना हा प्रश्न पडलाय की हे एवढं करून तो बाहेर कसा येतो, समजा तो जाळ्यात अडकला तर काय होणार? कॅप्शननुसार हा व्हिडीओ कोल्लममधील मासेमारांचा आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.