चेन्नईच्या उत्तरेस असलेल्या किनारपट्टीजवळील तिरुवल्लूर गावी तामिळनाडूच्या मंत्र्याच्या अधिकृत भेटीदरम्यान एक लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मंत्र्यावर टीका केली जात आहे.

तामिळनाडूचे मत्स्यव्यवसाय मंत्री अनिता राधाकृष्णन आपल्या अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी पालावरकडू पुलीकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासेमारी मंडळाची पाहणी करण्यासाठी गेले होती. त्यासाठी त्यांनी बोटीतून प्रवास केला. बोटीतून खाली उतरत असतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोट किनाऱ्यावर आली तेव्हा आपले बूट आणि धोतर ओले होण्याच्या भीतीने मंत्री बोटीतून खाली उतरत नव्हते. ते पाहून एका मच्छीमाराने त्यांना उचलले व किनाऱ्यावर आणले.

६८ वर्षीय द्रमुक मंत्री पालावरकडूयेथील समुद्राची धूप होत असल्याने होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. जेव्हा बोट किनाऱ्यावर आली तेव्हा त्यांनी पाहिले की कोरडी जमीन फार दूर आहे आणि जर ते खाली उतरला तर त्याचे बूट ओले होतील. म्हणून त्यांच्या समर्थकाने आणि इतर मच्छीमारांनी त्यांना खांद्यावर घेऊन कोरड्या जागी नेले. या घटनेचा कुणीतरी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला. व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून लोकांनी मंत्र्यांच्या व्हीआयपी संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनिता राधाकृष्णन यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिली नाही, पण सोशल मीडियावर त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.

अनिता आर राधाकृष्णन २००१ आणि २००६ मध्ये एआयएडीएमकेच्या तिकिटावर तिरुचेंदूर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला आणि २००९ (पोटनिवडणूक), २०११, २०१६  आणि २०२१ मध्येही या जागेवरुन ते विजयी झाले. २०२१ मधील विजयानंतर त्यांना मंत्री करण्यात आले.

Story img Loader