Viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यावर आपण हसता-हसता रडायला लागतो. तर काही व्हिडीओ आपल्याला भावूक करतात. फेसबुक, इन्स्टाग्रामवरचे काही व्हिडीओ पाहून आपल्या तोंडातून आपसुकच ‘वाहह’ असे शब्द बाहेर पडतात. अशाच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये महाकाय समुद्राच्या मधोमध लोकं अनोख्या पद्धतीनं मासेमारी करत आहेत. या लोकांचा वेग पाहून तुम्हीही अवाक् व्हाल..
मासेमारी करणे हे जगातील सर्वात अवघड कामांपैकी एक आहे. लांबून पाहणाऱ्याला हे काम खूप सोप्पं आहे असं वाटत असतं.आपल्याकडे मासेमारी करण्यासाठी मोठमोठ्या जाळ्यांचा वापर केला जातो. परदेशी मासेमारी हा छंद म्हणून जोपासला जातो. तेथे लोक फिशिंग रॉड घेऊन मासे पकडायला जातात. गळाचा खादय लावून मासे गळाला लागेपर्यंत वाट पाहणं थकवणारं असतं. मात्र या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे लोक अगदी सहज आणि वेगानं मासे पकडत आहेत. यामध्ये छोटे मोठे असे सर्व प्रकारचे मासे ते पकडत आहेत.
एखाद्या मशीनप्रमाणे हे लोक हात चालवत आहेत. त्यांचा वेग पाहून खरंच आश्चर्य वाटतं. आश्चर्य म्हणजे ही जहाज खोल पाण्यात आहे आणि खूप जोरात लाटा उसळत आहेत. त्यात जहाजाच्या कोपऱ्यावर बसून हे लोक इतक्या वेगाने काम करत आहेत की त्यांना पाहून काही लोकांनी काळजी देखील व्यक्त केली आहे
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: महागड्या साड्या चोरणाऱ्या महिला सीसीटीव्हीत कैद; हातचलाखी पाहून व्हाल हैराण
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @the_viralvideos या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.