Viral video: सोशल मीडियावर थक्क करणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यावर डोळे भरून येतात; तर काही व्हिडीओ प्रेरणादायी असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एखाद्या गोष्टीचा नाद म्हणजे नक्की काय असतो हे या व्हिडीओतून पाहायला मिळालं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.
कुस्तीचा नाद शेवटच्या श्वासापर्यंत गेला नाही
व्हिडीओमध्ये हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले हे आजोबा पैलवान आहेत आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप कुस्त्या मारल्या आहेत. मात्र, या आजोबांचा आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असतानाही कुस्तीचा नाद काही गेला नव्हता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आजोबा रुग्णालयात खाटेवर झोपलेले दिसत असून, त्यांच्या हाताला सलाईन लावलेलं दिसत आहे आणि उपचारासाठी त्यांच्या नाकातही नळी घातलेली आहे. आपल्या आयुष्याचे शेवटचे काही दिवस जगतानाही पैलवान ह.भ.प. गंगाराम महाराज ठाकरे यांचं कुस्तीचं वेड कमी झालेलं नाही. अशा परिस्थितीतही ते आपला दंड थोपटून घेत आहेत. हा व्हिडीओ पाहून खरंच शेवटचा काळ कसा असतो हे पाहायला मिळत आहे.
साधारणपणे तरुणांमध्ये फिटनेसची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. त्यासाठी ते जिम, कार्डिओ यांशिवाय वेगवेगळे वर्कआउट्स करतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आजोबा दिसत आहेत. या आजोबांचे हावभाव आणि वर्तणूक यांवरून तारुण्यात ते किती फिट असतील आणि त्यांची मेहनत जाणवते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स चकित झाले आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतलेली वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की, बघणाऱ्यालाही वेगळा उत्साह आणि प्रेरणा मिळते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> PHOTO: “नमस्कार मी पुणेकर, कृपया जोडप्यांनी…” पुण्यातल्या रिक्षातली भन्नाट पाटी व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील pai_juned_mulla या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. “कुस्तीचा नाद शेवटच्या श्वासापर्यंत गेला नाही”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
कुस्ती खेळाडू म्हटलं कि आपल्याला खाशाबा जाधव यांचे नाव आठवतं. होय खाशाबा म्हणजे १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविणारे पहिले भारतीय. मल्ल दारा सिंह हे देखील कुस्तीतील एक नामांकित पैलवान. महाराष्ट्रातील गावाकडचे खेळ म्हटले की कबड्डी, खो-खो, लगोरी असे खेळ समोर येतात. परंतु असाच एक गावाकडील खेळ जो साता समुद्रापलीकडे देखील खेळला जातो, तो म्हणजे कुस्ती.कुस्ती हा खेळ फार पूर्वीपासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ आहे. हा दोघांमध्ये खेळला जातो. डाव, चपळता , निर्णयक्षमता या खेळात महत्त्वाची असते. या खेळात अनेक डावपेच असतात .