Sanju Samson Fitness Tips: भारतीय संघाचा विकेटकिपर संजू सॅमसनसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेलेला मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना अविस्मरणीय ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेतील पार्ल येथील बोलंड पार्कच्या क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या सामन्यात त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याच्या खेळातील कामगिरीच्या सातत्यावर वांरवांर प्रश्न उपस्थित केला जात होता. पण त्याने प्रोटियाज सारख्या बलाढ्या संघाविरुद्ध शतक झळकावून स्वत:ला जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्याचा आनंद साजरा करण्याची पद्धतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. शतक झळकवल्यानंतर आनंद व्यक्त करताना त्याने आपला बाहूबली लूक दाखवला जो सर्वांना खूप आवडला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
संजूचा ‘बाइसेप्स सेलिब्रेशन’ व्हिडीओ झाला व्हायरल
संजू सॅमसनने 44 व्या ओव्हरच्या सहाव्या बॉलवर सिंग खेळत आपले शतक पूर्ण केले, त्यानंतर त्याने प्रथम बॅट आणि हेल्मेट उंचावत प्रेक्षकांच्या जल्लोषाला प्रतिसाद दिला. त्यानंतर उजवा हात हलवून आनंद साजरा केला. एका हाताच्या बायसेप्स दाखवत त्याने आनंद व्यक्त केला. त्याचा हा बाहूबली लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. सोशल मीडियावर ‘बायसेप्स सेलिब्रेशन’चा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता प्रेक्षकांना त्याच्या फिटनेसचे गुपित काय आहे हे जाणून घ्यायचे आहे.
हेही वाचा – कुत्र्याच्या पिल्लांसाठी चिमुकल्याने केला भागंडा डान्स; गोंडस व्हिडीओ होतो व्हायरल, एकदा बघाच!
वेट लिफ्टिंग
संजू सॅमसनचे इंस्टाग्राम पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की तो नेहमी वेट लिफ्टिंग करताना दिसतो. या व्यायामामुळे स्नायू वाढतात आणि बायसेप्स देखील तयार होऊ लागतात. हा त्याचा आवडता व्यायाम आहे ज्यामुळे शरीराची ताकदही वाढते. तुमच्या शरीराला आकार देण्यासाठी तुम्ही या व्यायामाचीही मदत घेऊ शकता.
साखळी घेऊ करतो कसरत
संजू सॅमसन त्याच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक आहे, जुलै २०२३ मध्ये, त्याचा एक वर्कआउट फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो बंगळुरूमधील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये तो अवजड साखळी गळ्यात बांधून वर्कआउट करताना दिसला होता. त्याच्या या तीव्र व्यायामामुळे लोक त्याची तुलना WWE स्टार जॉन सीनाशी करू लागले होते. या व्यायामामुळे पायाचे स्नायू आणखी मजबूत होतात.
हेही वाचा – एम.एस. धोनी आणि ऋषभ पंत यांच्यात रंगला सामना; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
संजूचा आहार
झी न्युजने दिलेल्या माहितीनुसार, “संजू सॅमसन फिटनेससाठी काटेकोर डाएट फॉलो करतो. तो त्याच्या आई लीजी विश्वनाथने आपल्या हाताने तयार केलेले अन्न त्याला आवडते. पण तरीही तो निरोगी राहण्यासाठी तो कोशिंबीर, भाज्या, अंडी, मांस, दूध आणि मासे खातो. याशिवाय ते तेलकट पदार्थ शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो.”