Rare Vulture Viral Video : देशात मोठ्या प्रमाणावर गिधाड पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसत आहे. कारण अनेक राज्यांमध्ये गिधाड पक्षी अचानक गायब झाली असल्याचं बोललं जात आहे. पण उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक दुर्मिळ गिधाड सापडल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारपूरच्या कोलेनलगंज येथील इदगाहच्या स्मशानावर दुर्मिळ गिधाड सापडल्याची माहिती समोर आलीय. एका आठवड्यापासून हा गिधाड पक्षी याच परिसरात फिरत असल्याची माहिती आहे. लोकांनी त्या गिधाडाला पकडण्याची शर्थीचे प्रयत्न केल, पण सुरुवातीला त्यांना अपयश आलं. पण गिधाड जमिनीवर खाली आल्यानंतर त्याला पकडण्यात काही माणसांना यश आलं. त्यानंतर तातडीनं त्या लोकांनी गिधाडाला वनविभागाच्या ताब्यात दिलं. या गिधाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिधाडाला पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक लोकांची पुरती दमछाक झाली

स्थानिक नागरिक एएनआयशी बोलताना म्हणाला, “एका आठवड्यापासून हा गिधाड या परिसरात फिरत होता. गिधाडाला पकडण्याचा आम्ही प्रयत्न केला पण सुरुवातीला अपयश आलं. मात्र, गिधाड खाली आल्यानंतर आम्ही त्याला पकडलं. गिधाड सापडल्याची माहिती तातडीनं वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर गिधाड पक्षी वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला.” या गिधाडाचा व्हिडीओ एएनआयने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत स्थानिक नागरिक गिधाडाचे पंख पसरवताना दिसत आहेत. गिधाडाला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तसंच या पक्षासोबत लोकांना फोटो काढण्याचा मोह आवरला नसल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या गिधाडाला पाच फुट लांबीचे पंख असल्याचे बोलले जाते.

नक्की वाचा – Viral Video: शिकार दिसताच चित्ता वाऱ्यासारखा सुसाट धावला, २२ फुटांची लांब झेप घेतली अन्…

इथे पाहा व्हिडीओ

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय प्रदेशात १९९० च्या दशकात गिधाडांची संख्या कमी झाली. अॅंटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्जचा वापर केल्याने गिधाडांची लोकसंख्या मंदावली असल्याची माहिती नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालतून समोर आली. या ड्रग्जमुळे गिधाडांना मूत्रपिंडाचे आजार झाले. मृत प्राण्यांचे मांस खाल्ल्याने गिधाडांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला. तसंच प्राण्यांच्या मृतदेहावर विषारी द्रव्य टाकल्याने गिधाडांनी त्या प्राण्यांचे मांस खाल्ले आणि एकापाठो एक गिधाड पक्षी मरण पावले, अशीही माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशात सापडलेल्या गिधाडाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five foot wings on rare vulture found on uttar pradesh kanpur cemetery video goes viral on twitter forest department news nss