transgender wedding :ट्रान्सजेंडर किंवा तृतीयपंथी लोक सहसा असे असतात ज्यांना पुरुष किंवा महिला यापैकी कोणत्याही श्रेणीमध्ये ठेवता येत नाही. समाज अजूनही त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतो. अजूनही समाज त्यांना आपलं मानत नाही, नेहमीच त्यांना वेगळी वागणूक मिळते. अशातच ५ तृतीयपंथीयांच्या एका लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. छत्तीसगडमधील जंजगीर चंपा जिल्ह्यात एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. येथे पाच तृतीयपंथी आपल्या गुरूशी लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.सर्वार्थाने विशेष ठरलेल्या या ट्रान्स समुदायाच्या सर्व पारंपारिक चालीरीतींचे पालन करणाऱ्या या समारंभात तृतीयपंथीयांनी समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थनाही केली. भारतीय किन्नर समुदयाने या विवाहाचे आयोजन केले होते. या विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तीन दिवस चालला सोहळा –
दरम्यान हा तब्बल तीन दिवस या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पहिल्या दिवशी कुलदेवता बहुचरा मातेची पूजा दुसऱ्या दिवशी मातेसमोर हळद खेळण्याचा सोहळा तर तिसऱ्या दिवशी राज्यभरातील तृतीयपंथीय एकत्र येत कलश यात्रा काढली. अतिशय लक्षवेधी ठरलेल्या या विवाहसोहळ्यात सर्व विधी पार पाडण्यात आले. वर-वधू आणि उपस्थित ट्रान्सजेंडर्सनी एकमेकांना हळद लावली. विवाहासाठी खास असा भव्य मंडप उभारण्यात आला होता. तसेच, किन्नर समजातील विविध मंडळींनाही निमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे निमंत्रण नसतानाही अत्यंत प्रेमापोटी स्वखुशीने उपस्थित राहिलेल्या तृतीयपंथीयांची संख्या अधिक होती.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video viral: बिबट्याची शिकारीसाठी चित्तथरारक झेप, पण शिकार मात्र चुकला
या तृतीय पंथियांपैकी एकीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तीच्यामुळे बऱ्याच तृतीयपंथीयांना तिने आदर्श उभा केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला असून, अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत यानांही जगण्याचा अधिकार आहे असं म्हंटलं आहे.