लहान मुलांना घरात एकटं सोडून जाताना काही वस्तू त्यांच्यापासून दूरच ठेवलेल्या बऱ्या, नाहीतर ते काय करतील याचा काही नेम नाही. कारण एकदा का त्यांच्या हातात त्या वस्तू लागल्या की एकतर ते त्या वस्तूची वाट तरी लावतील किंवा स्वत:ला काहीतरी करून तरी घेतील. सगळेच पालक याची दक्षता घेतात, पण चीनमधल्या एका वडिलांना मात्र हे जरा जास्तच महागात पडलं. एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे त्यांना साडेचार लाखांचा फटका बसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चीनमध्ये राहणाऱ्या गाओ यांनी काही रोकड घरात लपवून ठेवली होती. ही रोकड नेमकी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलाच्या हाती लागली आणि कागद समजून या मुलाने पैसे फाडायला सुरूवात केली. आता त्या बिचाऱ्याला तरी काय माहिती की हे नुसते कागद नसून, त्यांचे मोल कैक पटीने अधिक आहे ते. जेव्हा गाओ घरी आले तेव्हा घरात विखुरलेले नोटांचे तुकडे पाहून त्यांना जबर धक्का बसला. कारण त्याच्या लहान मुलाने थोडी थोडकी नाही तर ५० हजार येन एवढी रोकड फाडली होती. आपल्याकडील रुपयात मोजायचे झाले तर ही रक्कम साडेचार लाखांच्या वर तरी जाते.

पण बिचाऱ्या बाबांनी संयम राखत हे तुकडे गोळा केले. आता शेवटची आशा म्हणून नोटांचे तुकडे घेऊन ते बँकेत गेले. आता बँकेचे कर्मचारी तरी यावर काय सांगणार म्हणा. नोटा बदलून हव्या असतील तर हे तुकडे नीट जोडून आणण्याचे त्यांना सांगण्यात आले. आता या तुकड्यांवर पाणी सोडावं एवढी छोटी ही रक्कम नक्कीच नव्हती. तेव्हा हे तुकडे तुकडे जोडण्याशिवाय बाबांकडे दुसरा पर्यायही नव्हता. आता हे गाओच्या बाबतीत झालंय तसं कोणाच्याही बाबातीत होऊ शकतं, तेव्हा लहान मुलांपासून मौल्यवान वस्तू जरा दूरच ठेवलेल्या बऱ्या, नाहीतर गाओसारखी वेळ आपल्यावरही यायची.