आठ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आणि देशात काही क्षणात मोठा बदल झाला. प्रधानमंत्रीनी देशाला संबोधन करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर बॅंकांच्या बाहेर मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या. याच निर्णयला आज पाच वर्ष पूर्ण होत आहेत.
कधीच कोणी न विचार केलेली घटना अचानक घडल्यामुळे लोकांची त्या वेळी तारांबळ उडाली होती. तरी सरकारने लोकांना नोटा बदलण्यासाठी वेळ दिला होता. पण त्यावर अनेक प्रकारच्या अटीही घातल्या होत्या. त्या वेळी ८६ टक्के चलन कागदाचा तुकडा बनले होते. लोकांना जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आणि मग काय संपूर्ण भारत रांगेत उभा राहिला. अनेकवेळा तासन् तास लांबच लांब रांगा लावलेल्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. अनेक घटनाही घडल्या, यावरून राजकारणही खूप झाले.
( हे ही वाचा: Viral: कागदाच्या तुकड्याकडे पाहत असलेल्या धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर मिम्सचा पाऊस! )
तथापी ९९% चलन बॅंकांमध्ये जमा झाले. सरकारने दावा केला की नोटबंदी नंतर डीजीटल व्यवहारामध्ये वाढ झाली. काळा पैसा रोखण्यातही मदत झाली असं सरकारचं म्हणने आहे. नोटाबंदीच्या पाच वर्षानंतर लोक सोशल मीडीयावर मिम्स शेअर करत आहेत.