Biggest Rabbit In The World Video Viral : अनेक लोक घरात असलेल्या पाळीव प्राण्यांसोबत मस्ती करतात. अशात सुंदर सशाला पाहिलं तर तुम्हालाही त्याला कुशीत घेऊन खेळावंस वाटेल. छोट्याशा सशाला पाहून आनंद तर वाटणारच. पण कुत्र्याएवढ्या आकाराचा ससा पाहिला, तर तुम्हाही थक्का झाल्याशिवाय राहणार नाहीत. सोशल मीडियावर सशाचा अशाचप्रकारचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचाही गोंधळ नक्कीच उडेल आणि म्हणाल, हा ससा आहे की आणखी कोणता प्राणी…
@JosephMorrisYT नावाच्या यूजरने सशाचा हा सुंदर व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने भलामोठा सास हातात पकडला आहे. या सशाचा आकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ४ फूट लांबीचा हा ससा कुत्र्याच्या आकाराएवढा असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा ससा सांभाळताना त्या व्यक्तीच्या नाकीनऊ आल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, या सशासोबत खेळायला नक्कीच आवडेल.
नक्की वाचा – Optical Illusion: घनदाट जंगल दिसतोय ना? पण एक वाघही लपलाय, दिसला नसेल तर क्लिक करून बघा
इथे पाहा सशाचा सुंदर व्हिडीओ
काय आहे सशाची खासीयत ?
अशाप्रकारच्या मोठ्या सशाच्या प्रजातीला फ्लेमिश रॅबिट (Flemish Rabbit) असं म्हटलं जातं. हा ससा खासकरून यूरोप आणि नॉर्थ अमेरिकेत आढळतात. या सशांची खासीयत अशी आहे की, या सशांना गरजेनुसार ट्रेनिंगही दिली जाऊ शकते. हा ससा ३ किंवा ४ फूट लांबीच्या आकाराचा असतो. तसंच या सशाचं वजन १० किलो किंवा त्याहून जास्त असू शकतं. अमेरिका रॅबिट ब्रीड असोसिएशनच्या माहितीनुसार, हा ससा सात वेगवेगळ्या रंगामध्ये आढळतो. सर्वात जास्त २२ किलो वजनाचा ससा फ्लेमिश जायंट रॅबिट (Darius)नावाने ओळखलो जातो.