Traveling Tips :विमान प्रवास करताना आपल्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येतात. पण बहुतेक प्रश्न खाण्यापिण्याशी संबंधित असतात. अनेकवेळा अशा बातम्याही आल्या आहेत, त्यामुळे काय खावे आणि काय खाऊ नये, असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान एका फ्लाइट अटेंडंटने विमानात कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नये याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका अमेरिकन एअरलाईन्समध्ये काम करणारी व्हिटनी म्हणाली, तिथे मिळणारे सर्व खाद्यपदार्थ अतिशय चवदार, स्वच्छ आणि ताजे असतील या विचाराने विमानात अजिबात खाऊ नका. पाणीसुद्धा तुमच्यासाठी हानिकारक असू शकते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बहुतेक फ्लाइट अटेंडंट कधीही नळाचे पाणी, मशीन कॉफी किंवा चहा पीत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा की तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी सीलपॅक बाटलीतील पाण्याचा पर्याय निवडू शकता.

विमानात नॉनव्हेज टाळा

डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंटने नॉनव्हेज पदार्थ खाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ती म्हणाली की, ते कसे तयार केले जाते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हजारो फूट हवेत ज्या प्रकारे अन्न शिजवले जाते याचा अर्थ असा होतो की मांस सहसा जास्त शिजवलेले असते. त्यामुळे नॉनव्हेज टाळणे उत्तम

अल्कहोल टाळा

फ्लाइटमध्ये कधीही अल्कोहोलचे सेवन करू नका, कारण त्याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. विमानाच्या केबिनमध्ये बॅरोमेट्रिक दाब सामान्यपेक्षा कमी आहे. याचा अर्थ तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी खूपच कमी असेल. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही दारू पितात तेव्हा तुम्हाला अधिक लवकर नशा चढते.

हेही वाचा- Accident video: ट्रॅक्टरखाली डोकं आलं मात्र हेल्मेटनं मृत्यू रोखला! ४४ सेकंदात जाणून घ्या हेल्मेटचं महत्त्व

चुकूनही या गोष्टी घेऊ नका

क्रू मेंबर्सनीही पनीर खाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यांच्या मते, बहुतेक वेळा फ्लाइटमध्ये पाणी ताजे नसते. तसेच पास्ता, सूप आणि मांसासह सँडविच यांचा समावेश आहे. खूप प्रक्रिया केलेले अन्न किंवा जास्त सोडियम असलेले काहीही घेऊ नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flight attendant revealed secret what to eat and what not while traveling in plane will surprise you srk