सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ शेअर केले जातात. यामध्ये शेकडो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, तर काही व्हिडीओ असे आहेत जे लोक दीर्घकाळ लक्षात राहतात. हे व्हिडीओ प्रेक्षकांना अगदी खळखळून हसण्यास भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये फ्लाईट अटेंडंट्सचा अनोखा अंदाज पाहून लोक त्याच्या प्रेमात पडू लागले आहेत.

विमान प्रवास सर्वांनाच आवडीचा असतो. प्रवाशांच्या सुखमय प्रवासासाठी विमान कर्मचारी सदैव तत्पर असतात. फ्लाईट अटेंडंट्सचे आदरातिथ्य हे तर विमान प्रवासाचं आकर्षण असतं. प्रवाशांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक फ्लाईटमध्ये फ्लाईट अटेंडंट्स उपस्थित असतात. सीटवर बसण्यापासून ते सीट बेल्ट लावण्यापर्यंत, अल्पोपाहार घेणे आणि टेकऑफ करण्यापासून ते उतरण्यापर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींसाठी ते मार्गदर्शन करत असतात. सुरूवातीला ते सर्वांसमोर स्वतः कृती करून सांगत असतात. अशाच एका फ्लाईट अटेंडंट्सचा हा व्हिडीओ पाहण्यासाठी फारच मजेदार आहे.

आणखी वाचा : VIRAL : ५० वर्षांच्या मेहनतीने मिळवलेली ६०० कोटींची संपत्ती गरीबांना केली दान, राहण्यासाठी फक्त घर उरले

हा फ्लाईट अंटेंडंट सर्वांना मार्गदर्शन करत होता. पण विमानातील कुणीच प्रवासी या बिचाऱ्या फ्लाईट अंटेंडंटकडे लक्ष देत नव्हते. प्रवाश्यांचं लक्ष वेधून घेण्यात हा फ्लाईट अंटेंडंट अयशस्वी ठरला. मग यापुढे या फ्लाईट अंटेंडंटने जे काही केलं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. कोणत्याच प्रवाश्याचं आपल्याकडे लक्ष नाही हे पाहून या फ्लाईट अंटेडंटने आपल्या अनोख्या अंदाजात प्रवाशांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली. मार्गदर्शन करण्याचा त्याचा हा मजेदार अंदाज साऱ्यांनाच आवडू लागलाय. हा अटेंडंट इझीजेटच्या विमानात होता.

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! आजी-आजोबांचा VIRAL VIDEO तरुणाईत एकदम हीट!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नादच खुळा! घोड्याच्या पाठीवर बसून कुत्र्याची ऐटीत सवारी; पाहा VIRAL VIDEO

या अटेंडंटने सेफ्टी जॅकेट खांद्यावर घेऊन ज्याप्रकारे कॅटवॉक केला ते पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओला आतापर्यंत ३१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या फ्लाईट अंटेडंटचं कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.

Story img Loader