उन्हाळ्यात सतत घाम का फुटतो? पावसाळ्यात लाटा अधिकाधिक उंच का उसळतात? ऑक्टोबर हीट का जाणवते? अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात सध्या वादळे का येत आहेत? डिसेंबरमध्ये थंडी का पडते? या सगळ्याचे त्या बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे एकच उत्तर आहे. ते म्हणजे वारा. वाऱ्याची दिशा आणि गती एकसारखी बदलत असते. असाच काहीसा प्रकार लंडनमध्ये पाहायला मिळाला, ज्याने लोकांचे धाबे दणाणले. झालं असं की लँडींगला एक मिनिट असताना सोसाट्याचा वारा आला त्यानंतर जे घडलं ते धडकी भरवणारं आहे. प्लेन लँडिंगचं थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
प्लेन लँडिंगचा थरार
वाऱ्याची दिशा कधीही बदलू शकते, असे म्हटले जाते. असाच काहीसा प्रकार लंडनमध्ये पाहायला मिळाला, ज्याने लोकांचे धाबे दणाणले. वास्तविक, विमानतळावर सोसाट्याचा वारा असताना एका विमानाने विचित्र लँडिंग केले. आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फॉक्स बिझनेसच्या म्हणण्यानुसार, पायलटनं लँडिंगपूर्वी विमान कसंतरी स्थिर केलं. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. फॉक्स बिझनेसच्या म्हणण्यानुसार, गेरिट वादळामुळे ही घटना घडली, ज्याने भयंकर रूप धारण केलं असतं. सुदैवाने या दुर्घटनेत प्रवाशांचा जीव थोडत्यात बचावला आहे.
विशेष म्हणजे या काळात कोणतीही दुर्घटना घडली नाही आणि लोक सुखरूप पोहोचले. जोरदार वाऱ्यामुळे विमान उतरवण्यात अडचण येत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. रिपोर्टनुसार, पायलटने लँडिंगपूर्वी विमान कसेतरी स्थिर केले. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी चौकशीची मागणीही केली आहे. या अपघातात प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा>> कडाक्याच्या थंडीत साडी नेसून बाईकवर उलटी बसली; बाईकस्वाराला पाहून तरुणीनं केलं असं काही की; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.एका यूजरने लिहिले – पायलटच्या शहाणपणामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. आणखी एका युजरने लिहिले – हृदयद्रावक व्हिडिओ. त्याचवेळी दुसर्या यूजरने लिहिले – फ्लाइटमध्ये बसलेल्या प्रवाशांची काय स्थिती असेल हे त्यांनाच ठाऊक.