कुठेही प्रवासाला जायचं म्हटलं आणि रेल्वे किंवा प्लाईटला उशीर होणार आहे, हे समज्यानंतर आपण थोडा वेळ वाट पाहतो. शिवाय प्लाईट किंवा रेल्वेला ठराविक वेळेपेक्षा उशीर होणं हे सामान्य आहे. मात्र, एखादी प्लाईट १६ किंवा १८ तास उशीरा येणार हे समजल्यावर प्रवाशी आपलं तिकीट रद्द करतात आणि दुसऱ्या प्लाईटचे तिकीट बुक करुन जाणं पसंत करतात. पण सध्या एका व्यक्तीने त्याची प्लाईट १८ तास उशिराने येणार असल्याचं समजल्यानंतरही तिकीट रद्द केलं नाही. ज्याचा त्याचा चांगलाच फायदा झाला आहे.

एका प्लाईटला १८ तास उशीर होणार असल्याचं समजताच, सर्व प्रवाशांनी तिकीट रद्द केली, परंतु एका प्रवाशाने १८ तास उशीर झालेल्या प्लाईटची वाट पाहिली. अशा परिस्थितीत प्लाईटने त्या एका प्रवाशाला घेऊन उड्डाण केलं आणि त्याचा प्रवास आठवणीत राहण्यासारखा झाला, प्रवाशाने त्याच्या प्रवासाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो पाहून अनेकांनी प्रवाशाने चांगला निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

Western Railway has clarified that air conditioned local trains will continue to operate from Bhayandar railway station
८:२४,ची लोकल वातानुकूलितच ,आंदोलनानंतरही रेल्वे प्रशासन ठाम
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sudhir Mehta expressed his opinion regarding Pune Airport Pune news
‘पुणे विमानतळाचा व्यावसायिकदृष्ट्या विस्तार महत्त्वाचा’,कोणी केली मागणी ?
cab driver viral video
VIDEO : टॅक्सी चालकाला पोहोचायला ७ मिनिटांचा उशीर, महिलेने घातला राडा; चालकाच्या अंगावर थुंकत म्हणाली…
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Why Shiv Sainik Dug Wankhede Pitch in 1991 by Orders of Balasaheb Thackrey Before India vs Pakistan Match
Wankhede Stadium: बाळासाहेबांचा इशारा अन् शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं, पाकिस्तान बरोबरच्या ‘त्या’ सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं?

हेही पाहा- हौसेला मोल नाही! जलपरी बनण्यासाठी महिलेने चांगल्या नोकरीचा दिला राजीनामा; म्हणाली, “आयुष्यात पैसा नव्हे…”

या घटनेतील प्रवाशाचे नाव फिल स्ट्रिंगर असे आहे, त्याने आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. जो खरंच आश्चर्यकारक आहे. व्हिडिओमध्ये फिल सांगतो की, त्याची फ्लाईट १८ तास उशीरा आली आणि जेव्हा तो फ्लाईटमध्ये गेला तेव्हा त्याला समजलं की या फ्लाईटमध्ये तो एकटाच प्रवासी आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फिल स्ट्रिंगर फ्लाइटच्या क्रू मेंबर्ससोबत मौज-मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना फिलने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “१८ तासांच्या उशीराने या फ्लाईटमधील प्रवासाचे पार्टीत रूपांतर झाले. फ्लाईटमधील क्रू आणि मी या संधीचा कसा पुरेपूर फायदा घेतला ते पाहा.”

सध्या फिलचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. जो अडीच लाखाहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, “अशा परिस्थितीत फ्लाइट रद्द करत नाहीत का?” तर दुसऱ्याने लिहिले, “हे आश्चर्यकारक आहे.” तर अनेाकांनी हा प्रवाशी नशीबवान असल्याचं म्हटलं आहे, कारण त्याने खासगी जेटप्रमाणे विमानातून एकट्याने प्रवास करण्याचा आनंद घेतला आहे

Story img Loader