Viral video: नवीन वर्षात अनेकजण विमानाने परदेशात जाण्याचे प्लान बनवत असतात. नवीन वर्षात काही स्वप्न, इच्छा पूर्ण करण्याचे संकल्प अनेकजण करतात. त्यात परदेशात फिरण्याचा, वर्ल्ड टूर करणे अनेकांचे स्वप्न असते.विमानाने प्रवास करताना तुमच्या बॅगचे वजन चेक केले जाते. जर तुमच्या बॅगचे वजन नियमांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काही वस्तू काढून ठेवाव्या लागतात. तुम्ही विमानप्रवास करताना एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकतात. त्यापेक्षा जास्त बॅग नेली तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.

विमानात प्रवास करताना प्रिमियम किंवा इकोनॉमी क्लासमधील प्रवासी फक्त एक हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकतात. या बॅगेचे वजन ७-८ किलो असावे. तर फर्स्ट आणि बिझनेस क्लासच्या लोकांना १० किलोपर्यंतचे वजन घेऊन जाता येईल.आणि त्यापेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. अर्थात हा नियम विमान कंपनी आणि तुम्ही कुठल्या क्लासमधून प्रवास करताय त्यानुसार बदलतो. मात्र जर तुमचं सामान १२ किलो आहे आणि एअरपोर्टवर तपासणी करत असताना १४ किलो दाखवलं. आणि त्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे भरा असं सांगितलं तर तुम्ही काय कराल? कारण असाच काहीसा प्रकार चंदीगढ एअरपोर्टवर घडलाय. इंडिगोचे वजन काटे असे काही घोळ घालताहेत की पाहून प्रवासी अक्षरश: वैतागले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणावर विमान कंपनीनं जे उत्तर दिलेय ते पाहून तुमचा पारा आणखी चढेल. आता तुम्हीच सांगा करायचं काय?

@thewolfofjobstreet या इन्स्टाग्राम पेजवरून एका विमान प्रवाशानं त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानं केलेल्या दाव्यानुसार ३० जानेवारी रोजी दुपारी ४ च्या आसपास तो इंडिगो फ्लाईटनं प्रवास करत होता. त्यावेळी चंदिगढ एअरपोर्टवर सामानाचं वजन करताना काहीतरी गोंधळ झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. यावेळी झालं असं की, एका वजन काट्यावर बॅगेचं वजन १२ किलो ३०० ग्रॅम दाखवत होतं तर त्याच्याच अगदी शेजारच्या वजन काट्यावर १४ किलो ५० ग्रॅम दाखवत होतं. म्हणजे दोन्ही काट्यांमध्ये जवळपास २ किलो ३०० ग्रॅमचा फरक होता. बरं, या प्रकरणी जेव्हा त्यानं तेथील कर्मचाऱ्यांकडे जाब विचारला तेव्हा त्यांनी अक्षरश: उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे तुम्हीही इथून पुढे प्रवास करताना सावध राहा आणि अशाप्रकारच्या फसवणूकीला बळी पडू नका.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ thewolfofjobstreet नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “तीच बॅग. दोन काउंटर, दोन वेगवेगळी वजने आणि २.३ KGs फरक. ही यंत्रे सहज हाताळता येतात का? मला आशा आहे की हे एक दुर्मिळ प्रकरण आणि तांत्रिक बिघाड आहे. मला साधारणपणे असे वाटले की माझी बॅग एवढी जड नाही, म्हणून दुसऱ्या काउंटरवर असलेल्या महिलेने मला ती दुसऱ्या बेल्टवर तपासण्यास सांगितले. आणि यावेळी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तेव्हा बॅगेचं वजन कमी दाखवलं. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे व्यवस्थेवरचा आपला विश्वासाला तडा जातो. त्यामुळे मला आशा आहे की हे खूप गांभीर्याने घेतले जाईल.” असं लिहलं आहे. तर नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटंलय, हे सगळं मुद्दाम करत आहेत. तर दुसऱ्या एकानं”पैसे उकळण्यासाठी काहीही करतील” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader