एअर इंडियाने शुक्रवारी आपला नवीन इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ ‘सेफ्टी मुद्रा’ लॉन्च केला. यात भारतातील विविध शास्त्रीय आणि लोकनृत्यांमधून भारताच्या समृद्ध संस्कृतीचे चित्रण करण्यात आले आहे. या लोकनृत्यांमधून विमानाच्या उड्डाणादरम्यान सुरक्षेशी निगडीत गोष्टीही समजावून सांगण्यात आल्या आहेत. एअरलाइन्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भरतनाट्यम, ओडिसी, कथकली, कथ्थक, घूमर, बिहू आणि गिद्धा यांसारखी अनेक लोकनृत्ये दाखवण्यात आली आहेत. या व्हिडिओमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये दाखविलेल्या प्रत्येक लोकनृत्याच्या ‘मुद्रां’मार्फत सुरक्ष नियमांबाबत माहिती देण्यात आले आहे. व्हिडिओमधील प्रत्येक नृत्य प्रकार आकर्षक आणि सांस्कृतिक पद्धतीने सादर केलेल्या विशिष्ट सुरक्षा सूचना सांगत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एअर इंडियाने X वर व्हिडिओ पोस्ट केला आहे

एअर इंडियाने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे. व्हिडिओसह पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “टाटा समूहाद्वारे समर्थित एअर इंडियाने भारताच्या सांस्कृतिक समृद्धी आणि लोककलांनी प्रेरित ‘सेफ्टी मुद्रा’ नावाचा नवीन इनफ्लाइट सुरक्षा व्हिडिओ लॉन्च केला आहे. व्हिडीओचा उद्देश प्रवाशांना आकर्षिक करणे, शतकांपासून भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोककला प्रकारांनी कथाकथन आणि सूचनांचे माध्यम म्हणून काम केले आहे. आज तो आणखी एक किस्सा सांगत आहे, ही कहाणी इनफ्लाइट सेफ्टीशी संबंधित सादर करत आहोत, एअर इंडियाचा नवीन सुरक्षा फिल्म, भारतातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण नृत्य परंपरांनी प्रेरित.”

एअरलाइनने जारी केलेल्या निवेदनानुसार हा व्हिडिओ दिग्दर्शक भरत बाला, मॅककॅन वर्ल्ड ग्रुप एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष, गीतकार प्रसून जोशी आणि गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या सहकार्याने बनवण्यात आला आहे.

हेही वाचा – घरच्या घरी बनवा हळदीपासून कुंकू! आजीबाईंनी संगितली ट्रिक, पाहा Viral Video

भारताची संस्कृतीची झलक दर्शविणारी रचना

एअर इंडिया,सीईओ आणि एमडी, कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले की, “देशाचा ध्वजवाहक आणि भारतीय कला आणि संस्कृतीचा दीर्घकाळ संरक्षक म्हणून, एअर इंडियाला हे व्हिडिओ कलात्मक स्वरूपात सादर करताना आनंद होत आहे, आपल्या भारताची समृद्ध संस्कृती दर्शविताना आवश्यक सुरक्षा निर्देशांची माहिती देण्यासाठी डिझाइन केले आहे. जगभरातील प्रवाशांसाठी विविधतेची झलक दाखवणे.

हेही वाचा – तुम्ही ‘महाराष्ट्रीयन’ आहात की, ‘महाराष्ट्रीय? मराठी भाषेतील रोजच्या रोज चुकणारे ‘हे’ शब्द तुम्ही वापरता का?

एअर इंडियाच्या A350 विमानात सुरक्षा व्हिडिओ सुरुवातीला उपलब्ध असेल, असे एअरलाइनने म्हटले आहे. ए३५०350 ही एअर इंडियाच्या विमानात अलीकडची भर पडली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये लाँच झालेल्या ३१६ आसनी ए३५०-९००विमानात२८ खाजगी बिझनेस सूट्ससह फुल-फ्लॅट बेड्स,२४ प्रीमियम इकॉनॉमी आणि २६४ इकॉनॉमी सीटसह तीन-श्रेणींमध्ये केबिन कॉन्फिगरेशन आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flight safety instructions given by air india showing a glimpse of indias diverse culture video viral snk