मार्च ते सप्टेंबरदरम्यान तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करताय का? मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण इंडिगोनंतर आता आणखी एक एअरलाइन कंपनी तुमच्यासाठी धमाकेदार ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत प्रवाशांना फेब्रुवारीमध्ये पॉकेट फ्रेंडली विमान तिकीट खरेदी करता येणार आहे. गो फर्स्ट एअरलाइन्सने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर जाहीर केली आहे. यानुसार प्रवाशांना केवळ ११९९ रुपयांमध्ये देशांतर्गत तर ६१३९ रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करता येईल. २३ फेब्रुवारी रोजी ही ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
या ऑफरनुसार, प्रवासी १२ मार्च ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी २४ फेब्रुवारीपर्यंत आपलं विमान तिकीट बुक करु शकततात. एप्रिल, मे महिन्यापासून अनेक शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या पडतील, यानिमित्ताने आत्तापासूनचं अनेक जण देश-विदेशात फिरायला जाण्याचे प्लॅन आखत आहे. यासाठी अनेक विमान कंपन्या तिकीटांवर ऑफर देत आहेत.
यापूर्वी इंडिगोने तिकीटांवर सवलत देऊ केली होती. यानंतर गो फर्स्टने आता कमी किंमतीत तिकीट ऑफर देऊ केले आहे. याबाबत गो फर्स्टने सांगितले की, देशांतर्गत प्रवासासाठी ११९९ रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ६१३९ रुपये असेल. ज्या प्रवाशांना या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे ते विमान कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करु शकतात.
विमानात ‘ही’ सीट असते सर्वात सुरक्षित? ३५ वर्षातील दुर्घटनांच्या रेकॉर्डमधून समोर आली मोठी माहिती
इंडिगोने १३ मार्च ते १३ ऑक्टोबर या कालावधीत प्रवाशांना २,०९३ किमतीत देशांतर्गत प्रवासासाठी तिकीटवर ऑफर दिली आहे. इंडिगोने २५ फेब्रुवारीपर्यंत तिकीट विक्री सुरु ठेवली आहे. याअंतर्गत प्रवाशांना १३ मार्च ते १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंतचं प्रवास तिकीट बुक करता येईल. मात्र याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वेही कंपनीकडून जारी करण्यात आली आहेत, त्यामुळे प्रवाशांना त्याचे पालन करणे बंधनकारक असेल.