Google Trending Flipkart and Amazon: सण-उत्सवाचे दिवस येत असून, घरोघरी नवीन वस्तू खरेदी करण्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यासाठी कुठून वस्तू विकत घ्यावी, कोणत्या ठिकाणी अधिक डिस्काऊंट मिळू शकेल, याची सर्चिंगदेखील अनेकांनी वेबसाईटवर सुरू केली आहे. कारण- आता फ्लिपकार्ट अन् अॅमेझॉनचा सेल जवळ आला आहे. ई कॉमर्सच्या फ्लिपकार्ट सेलवर तुम्हाला चांगली सूट मिळू शकते. अशातच फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल २६ तारखेपासून प्लस मेंबरसाठी सुरू झालाय आणि इतरांसाठी हा सेल २७ तारखेपासून सुरू होईल. या सेलमुळे गूगलवर लोक मोठ्या प्रमाणात या संदर्भात माहिती शोधत आहेत. मागील २४ तासांमध्ये गूगल ट्रेंडनुसार, फ्लिपकार्टने सर्च व्हॉल्यूममध्ये ७५% वाढ नोंदवली; तर Amazon ने ५०% वाढ नोंदवली.

Screengrab of trends.google

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने प्रमुख ऑफर्सचा खुलासादेखील केला आहे. त्यानुसार सर्व प्रॉडक्ट्सवर ८५ टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. त्यामुळे बिग बिलियन डेजमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, टीव्ही, एअर कंडिशनर आणि इतर होम अप्लायन्ससेज यांसारख्या प्रॉडक्ट्स कॅटेगरीवर दमदार डिस्काउंट मिळणार आहे. ग्राहकांना भरघोस सूट आणि इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन व गृहोपयोगी वस्तूंवर भरघोस सवलत देण्यासाठीही हा सेल ओळखला जातो. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डधारकांना ५% कॅशबॅक आणि फ्लिपकार्ट पे लेटरद्वारे १,००,००० पर्यंत विशेष ऑफर देण्यात येत आहे.

devendra fadnavis ajit pawar eknath shinde (1)
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस म्हणतात, “शिंदे गट, अजित पवार गट नवे पक्ष”; लोकसभेत ‘या’ बाबतीत कामगिरी वाईट झाल्याची कबुली!
25th September Rashi Bhavishya & Panchang
२५ सप्टेंबर पंचांग व राशीभविष्य: ग्रहमानाच्या साथीने दिवस…
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Chander Prakash Kaun Banega Crorepati 16
Kaun Banega Crorepati 16: २२ वर्षीय स्पर्धकाने ७ कोटींच्या ‘या’ प्रश्नावर सोडला खेळ; तुम्हाला माहीत आहे का उत्तर?
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
monkey entered in a classroom and hugged student video viral
भरवर्गात माकडाची एन्ट्री! विद्यार्थीनीला मारली मिठी, केस पकडले अन्…; पाहा खट्याळ VIDEO
EY toxic culture controversy ashneer grover
Ashneer Grover EY story: “एक कोटी पगार; तरीही पहिल्याच दिवशी पळालो” अशनीर ग्रोवरनं सांगितला EY कंपनीतील धक्कादायक अनुभव
Shivsena Sanjay Raut Convicts Kirit Somaiya Defamation Case
Sanjay Raut 15 Days Jail : “न्यायव्यवस्था कोणाची तरी र#**….”, अब्रूनुकसान प्रकरणी दोषी ठरल्यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

अॅमेझॉननेही २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिवल या सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, उपकरणे, घरातील आवश्यक वस्तू आणि बऱ्याच काही प्रॉडक्ट्सवर मोठ्या ऑफर असतील. सणासुदीच्या काळात आपल्यातील अनेक जण फ्रिजपासून ते नवीकोरी कार खरेदी कारण्यापर्यंतची स्वप्ने पाहत असतात. म्हणूनच विविध कंपन्या ग्राहकांसाठी भरपूर ऑफर्स व डिस्काउंट असणारे सेल घेऊन येत असतात. फ्लिपकार्ट अन् अॅमेझॉनचा सेल सारख्याच दिवशी आल्याने दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Cold Play: कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकिट विक्रित फसवणूक! तिकिटाची किंमत ३ लाख रुपये; गुगल ट्रेंड्समध्ये असणारी कोल्डप्ले कॉन्सर्ट आहे तरी काय?

अ‍ॅपल कंपनीने नुकतीच त्यांची आयफोन १६ सीरिज लाँच केली. मात्र, त्यानंतर आयफोन १५ च्या किमतीत कपात करण्यात आली. अशातच ग्राहकांच्या आनंदात आणखी भर घालणारी माहिती समोर येत आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल उद्या (२७ सप्टेंबर)पासून सुरू होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन १५ वर मोठी सूट मिळण्याची शक्यता आहे. त्याव्यतिरिक्त ग्राहकांना आयफोन ११, आयफोन १३ आणि इतर फोन अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.