Shocking video: मागील काही दिवसांपासून ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. लॉकडाउनमुळे यात अधिकच वाढ झाली आहे. लोक दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या ऑनलाईन आपल्या आवडत्या गोष्टी ऑर्डर करतात. काही वेळा वस्तू जशा साईटवर दिसल्या, तशाच येतात. तर कधी यात अनेकांची मोठी फसवणूकही होते. जशी वस्तू ऑनलाईन दिसते, तशी ऑर्डर डिलीव्हर होत नाही. मागवलं एक आणि आलं भलतंच, असे अनेक फोटो विविध साईट्सवरुन अनेक ग्राहकांनी शेअर केले आहेत.

हल्लीचा जमाना हा ऑनलाईन शॉपिंगचा आहे. लोकं बाजारात जाऊन वेळ वाया घालवण्याऐवजी घरबसल्या मोबाईलवरून वस्तू ऑर्डर करताहेत. अर्थात ऑनलाईन शॉपिंगमध्ये एखाद्या वस्तूसाठी अनेक पर्याय मिळतात आणि तसंच चांगली सूट सुद्धा मिळते. त्यामुळे लोकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे वाढल्याचं दिसून येतंय. पण कुठलीही गोष्ट ऑनलाईन मागवत असताना विशेष काळजी घ्या, कारण तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते.सध्या असंच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका तरुणानं फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन ब्रँडेड शूज मागवले होते. मात्र त्याला काय मिळालं पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग करताना आता १०० वेळा विचार कराल.हल्ली बरंच गोष्टी ऑनलाईन मागवल्या जातात. पण काही वेळा ऑनलाईन मागवलं जातं एक आणि येतं भलतंच. असंच एका व्यक्तीसोबत घडलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणानं फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन ब्रँडेड शूज मागवले होते. मात्र ते शूज इतक्या खराब अवस्थेत आले आहेत की तुम्ही विचारही नाही करु शकत. हे शूज दिसायला नवीनच दिसत आहेत मात्र शूजच्या सोलला हात लावताच तो तुटून खाली पडला. अक्षरश: शूजच्या सोलचा हातात चुरा होत होता. ब्रँडेड म्हणून आपण सहज ऑनलाईन वस्तू मागवतो मात्र त्या जशा दिसतात तशा येत नाहीत आता हेच प्रकरण पाहा ना. सध्याच्या काळात ऑनलाईन खरेदीवर तरुणाईचा अधिक भर आहे. तसेच प्रत्येक सणाला स्वत:ला ऑनलाईन कपडे किंवा अन्य वस्तू अधिक खरेदी केल्या जातात. देशात अनेक ठिकाणी ऑनलाईन खरेदी करत असताना फसवणूक केल्याची विविध प्रकरणं उघडकीस येत आहेत. तरी सुद्धा लोकांची खरेदीला अधिक पसंती आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shahrukhsaifi4167 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संतापले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader