प्रवास करताना आपणाला रस्त्याच्या कडेला लावलेल्या जाहिरातींचे हजारो होर्डिंग दिसतात. परंतु यातील सगळ्याच जाहिराती आपलं लक्ष वेधून घेत नाहीत, यासाठी त्या जाहिरातीमध्ये काहीतरी खास असावे लागते. ज्यामुळे ती नागरिकांना आकर्षिक करु शकेल. यासाठी अनेक जाहिरात कंपन्या वेगवेगळ्या आयडीया वापरतात. यासाठी ते योग्य आणि लोकांना आवडणारे मेसेज, रंगसंगती, व्हिज्युअलचा वापर करतात. शिवाय इतरांपेक्षा आपल्या कंपनीची जाहिरात चांगली असावी यासाठी कंपन्यामध्येही स्पर्धा सुरु असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर फ्लिपकार्टच्या अशाच एका भन्नाट जाहिरातीची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय या जाहिरातीच्या होर्डिंग सर्वांना आकर्षित केल्याचंही पाहायला मिळत आहे. तरी व्हायरल होत असलेली जाहिरात ही एक उत्कृष्ट मार्केटिंगचे उदाहरण असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर या जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.

फ्लिपकार्टची ही भन्नाट जाहिरात ट्विटर युजर प्रणव मल्लारपवार नावाच्या वापरकर्त्याने शेअर केली आहे. या फोटोमध्ये अनेक कंपन्यांच्या जाहिराती एकामागोमाग एक लावलेल्याचं दिसत आहे. परंतु, फ्लिपकार्टने परिस्थितीचा फायदा घेतला आहे. फ्लिपकार्टने इतर कंपनींच्या जाहिरातींची ज्या ठिकाणी गर्दी आहे त्याचाच आधार घेत आपल्या ग्राहकांना एक भन्नाट आणि अनोखा मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही पाहा- पावसाचं पाणी गोदामात शिरल्याने शेकडो गॅस सिलिंडर गेले वाहून, तरंगणारे सिलिंडर पाहून परिसरातील नागरिक चिंतेत

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये सॅमसंग, असुस, प्यूमा आणि सोनी या कंपन्यांच्या जाहिरातींचे होर्डींग लावल्याचे दिसत आहेत. फ्लिपकार्टने या सर्व जाहिरातींच्या मधोमध आपल्या कंपनीची जाहिरात लावली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, “आमच्या जवळपास ७ जाहिराती आहेत. तुम्ही प्रत्येक जाहिरातीत जे पाहता ते फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे!” लहान पण आकर्षक अशा या जाहिरातीने ग्राहकांचे लक्ष त्वरित वेधून घेतल्याचं दिसत आहे. तर अनेकांनी ‘छोटी जाहिरात, मोठा प्रभाव’ याचे हे उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

फ्लिपकार्टच्या अल्ट्रा-मार्केटिंगच्या जाहिरातीचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने “अप्रतिम! कॉपीरायटर” तर आणखी एकाने लिहिलं. “Ambush Marketing चा सर्वोत्तम वापर, शब्दात प्रतिभा आहे!” तर अनेकांनी संधीचा योग्य वापर फ्लिपकार्टने केल्याचं म्हटलं आहे. या जाहिरातीचे जसे लोकांनी कौतुक केले आहे, तसेच काहींनी टीकादेखील केली आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे, “चुकीचे लिहीले आहे, त्यांनी या सर्वांची कॉपी मिळते असं लिहायला पाहिजे.” नेटकरी वेगवेगळी मतं व्यक्त करत असले तरीही या जाहिरातीची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

Story img Loader