साप पकडणा-या गारुडीला आपल्याकडे काही विशेष महत्त्व नाही. तो बिचारा गारूडी आपल्या कौशल्याने या विषारी जीवाला पकडतो पण आपल्याला काय त्याचे फारसे अप्रुप नसते. अशा गारूड्यांचा उदरनिर्वाहच कसाबसा होतो. पण सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल की खास अजगरांना पकडण्यासाठी दोन भारतीय गारूड्यांना फ्लोरिडावरून बोलावणे आले अन् या गारुड्यांना मिळणारे पैसे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल कारण या गारुड्यांना चक्क फ्लोरिडाच्या वनविभागाने जवळपास ४६ लाख देऊ केले आहे.

वाचा : बिहारमधल्या शेकडो मुलांच्या रहस्यमयी मृत्यूला ‘लिची’ कारणीभूत?

फ्लोरिडाच्या वन्यजीव विभागाने तामिळनाडूच्या दोन गारुड्यांना खास फ्लोरिडात बोलावून घेतले आहे. मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल अशी या दोघांची नावे आहेत. वय वर्ष पन्नास असलेले हे भारतातील प्रसिद्ध गारुड्यांपैकी आहेत. या दोघांसोबत एका अनुवादकाला बोलावले आहे. या जंगलात बर्मी अजगर आहेत जे छोट्या प्राण्यांची शिकार करतात. या जंगलात विलुप्त होत असलेल्या अनेक प्रजाती आहे. अजगरांच्या हल्ल्यामुळे या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच या अजगरांना पकडण्याठी मासी आणि वैदिवेल यांना बोलावले गेले. या दोघांनी आतापर्यंत १६ फूट लांब अशा १३ अजगरांना पकडले आहे.

वाचा : अनुपम खेरनी चक्क अर्णब गोस्वामींना गप्प बसवलं!

Story img Loader