सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ प्राण्यांच्या शिकारीचे असतात. अनेकदा वन्यप्राणी मानवी वस्तीच शिरकाव करतात त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. सध्या असाच एका मगरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फ्लोरिडामधील आहे. एका तळ्याच्या काठी घर असलेल्या रहिवाशाच्या घरामध्ये एक मगर शिरण्याचा प्रयत्न करत आहे तेवढ्यात पुढे असे काही घडले जे पाहून नेटकरी पोट धरून हसत आहे.

नतालिया रोजासने (natalia_rojas_art) नावाच्या इंस्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. या घटनेचा खरा हिरो महिलेचा पाळीव कुत्रा पिंटो ठरला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एका महिला काचेच्या दाराशेजारी उभी बाहेर राहून डोकावते आहे. दाराच्या बाहेर अंगणामध्ये एक मगर दिसत आहे. मगरीला पाहून घरातील सदस्य चिंतेत आहेत. तेवढ्यात महिलेचा पाळीव कुत्रा दारासमोर उभा राहतो आणि मगरीला पाहून जोरजोरत भुंकतो. कुत्र्याचे भुंकणे ऐकून मगर घाबरते आणि तेथून धुम ठोकते. अंगणातून पळत जाऊन मगर थेट घरासमोरील तळ्यामध्ये उडी मारताना दिसत आहे. मगरीचा सामना करावा लागणे हा भितीदायक अनुभव आहे. सुदैवाना काचेच्या दारामुळे मगर घरात प्रवेश करू शकली नाही. पण ज्या पद्धतीने ही मगर कुत्र्याला पाहून पळून जाते ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. काहींनी घराबाहेर मगर आल्याबद्दल चिंता व्यक्ती केली. एकाने लिहिले की, “तुमच्या घरासमोरील तलावात अशा मगर राहत असतील तर तुम्ही तुमच्या कुत्र्याचा जीव धोक्यात घालत आहात!” आणि “तुम्ही अशा तलावाशेजारी असलेल्या घरात का राहात आहात?”

लोकांच्या प्रतिक्रिया पाहून नतालियाने सांगितले की,: “लोकहो, शांत व्हा! आम्हाला आता माहित आहे की आम्हाला लवकरात लवकर कुंपण लावणे आवश्यक आहे परंतु एका रात्रीत उभारता येत नाही. कुंपण कंपनीला साहित्य मिळवून ते बांधण्यासाठी काही आठवडे लागतील. पिंटोला कधीही एकटे सोडले जात नाही.”

पिंटोला त्याच्या शौर्याबद्दल खूप प्रेम कौतूक केले जात आहे “त्या कुत्र्याला सर्व उपचार द्या.”

तर काही लोकांनी कुत्र्याला पाहून धुम ठोकणाऱ्या मगरीला ट्रोल केले आहे. एकाने लिहिले की, “क्या मगरमच्छ बनेगा रे तू” (मगरीच्या नावावर कलंक आहे तू)

Story img Loader