Shocking video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्यासमोर दररोज हजारो व्हिडीओ येत असतात, ज्यापैकी काही व्हिडीओ हे खरंच आपल्या मनात घर करून बसतात. पण काही व्हिडीओ असेदेखील असतात, जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. एका पावलानं काय होतं, असा किती फरक पडतो हे तुम्हाला व्हिडीओ पाहून कळेल.

जीवन आणि मृत्यूच्यादरम्यान आपण जे क्षण जगतो ते खरं आयुष्य असतं. जीवन-मृत्यू हा आयुष्याचा अंत आणि आरंभ आहे म्हटले जाते. असे म्हणतात, आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगला पाहिजे, कारण मृत्यू कधी काळ म्हणून समोर येईल सांगता येत नाही. अनेकदा लोकांच्या आयुष्यात असे क्षण येतात, जेव्हा मृत्यूशी सामना होतो. काही जण मृत्यूच्या दारातून परत येतात. अनेकांचे असे अनुभव आपल्याला नेहमीच ऐकायला किंवा पाहायला मिळतात. दरम्यान, अशाच एका क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान उडणाऱ्या ढिगाऱ्याने एक पोलिस अधिकारी जखमी झाला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शहरातील कोंडापूर उपविभागातील बहुमजली बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू करण्यात आली होती. विध्वंस मोहिमेदरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसाला उडालेला दगड लागला. या घटनेच्या व्हिडीओमध्ये पोलिस काही अंतरावर उभा राहून इमारत पाडण्याचे रेकॉर्डिंग करत असताना अचानक एक दगड उडून येतो आणि त्याला जोरात लागतो.

आयुष्यात एका सेंकदाची किंमत काय?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बरेच लोक एका इमारतीच्या छतावर उभे आहेत. यावेळी समोरच एक अनधिकृत इमारतीचं बांधकाम पाडण्याचं काम सुरू आहे. अशावेळी हे सर्व जण आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ काढण्यासाठी उभे आहेत. याचवेळी एक व्यक्ती उभ्या असलेल्या जागेवरून व्हिडीओ काढण्यासाठी एक पाऊल पुढे जातो आणि तेवढ्यात इमारत कोसळते आणि इमारत कोसळताच इमारतीच्या बाजूने एक मोठा दगड उसळत येतो आणि व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर आदळतो. तो एका क्षणात खाली पडतो, व्हिडीओमध्ये तो गंभीर जखमी झाल्याचं दिसत आहे. आयुष्यात एका सेकंदाची किंमत काय विचारणाऱ्यांना हा व्हिडीओ बघून कळेल की आयुष्यात एका सेकंदाची किंमत किती आहे.. ही व्यक्ती जर पुढे गेलीच नसती तर कदाचित ती जखमी झाली नसती.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “पहिल्या नोकरीत पगार कमी असतो पण…” माजी आयएएस अधिकाऱ्यानं ४० वर्षांपूर्वीच्या पहिल्या नोकरीचा अनुभव केला शेअर

हा व्हिडीओ @BellamSwathi नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत १.३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेक कमेंट केल्या जात आहेत. युजर म्हणत आहेत की, इतकेही धाडस चांगले नाही की, जीवही जाऊ शकतो.