Eagle Attacks Leopard Viral Video : इंटरनेटवर वाईल्ड लाईफचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यांना पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. वाघ,सिंह अशा हिंस्र प्राण्यांचे शिकारीचे थरारक व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. परंतु, गरुड पक्षाने अशा खतरनाक प्राण्यांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. पण आता तुम्हाला गरुड पक्षाचा थरार पाहायला मिळणार आहे. कारण डोंगर कड्यावर असलेल्या एका बिबट्यावर गरुड पक्षाने हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हजारो फूट उंचीवरून झेप घेणाऱ्या गरुडाने बिबट्याच्या डोक्यावर नांगी मारली अन् त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

बिबट्यावर हल्ला केला अन् घडलं…

व्हिडीओच्या सुरुवातीला पाहू शकता की, एक बिबट्या डोंगर माथ्यावर विश्रांती घेण्यासाठी बसलेला असतो. त्याचदरम्यान आकाशात उडालेला गरूड त्या ठिकाणी अचानक येतो आणि बिबट्याच्या डोक्यावर नांगी मारतो. त्यानंतर बिबट्या पिसाळतो पण त्याला हल्ला कुणी केला आहे, हे कळतच नाही. कारण बिबट्याला पंजा मारल्यानंतर गरुड पुन्हा वाऱ्याच्या वेगासारखा उडून जातो. बिबट्याला डिवचण्यासाठी गरुडाने पंजा मारला, असंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणता येईल. कारण माकडंही अशाच प्रकारे मस्ती करत असतात.

नक्की वाचा – Video: पावसाचं पाणी बाथरुममध्ये साचवण्यासाठी खिडकीत केला भन्नाट जुगाड, महिलेची IDEA पाहून थक्क व्हाल

इथे पाहा गरुड अन् बिबट्याचा थरारक व्हिडीओ

Tag…You're It!
byu/AtomicCypher inAnimalsBeingJerks

व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटलं, गरुडाने हल्ला केल्यानंतर बिबट्याला दुखापत झाली. त्यामुळे तो पिसाळला आणि हल्ला करणाऱ्याला शोधण्याचा प्रयत्न करू लागला. बिबट्याचा पंजा किती धारदार असतो,तुम्हाला माहितीय का? तसंच दुसऱ्या एका यूजरने म्हटलं की, हा तर खूप छोटा व्हर्जन आहे. कारण चक्क कबुतराने आमच्या घरातील मांजरीवर हल्ला केला. अन्य एकाने म्हटलं, बिबटे आणि जंगलात वावरणारे मांजर भित्रे असतात.