Eagle Catching Fish Viral Video : घनदाट जंगलात झाडांवर असलेल्या घरट्यांमध्ये शेकडो पक्षांचा किलबीलाट सुरु असतो. काही पक्षी छोट्या मोठ्या किटकांना खाऊन पोटाची खळगी भरत असतात. हजारो पक्षांचे थवे आकाशात उडतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. पण इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओनं शेकडो नेटकऱ्यांना थक्क केलं आहे. कारण या व्हिडीओत पक्षांचा किलबीलाट नाही, तर गरुडाने हजारो फूट उंचीवरून माशाची शिकार केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पाण्यावर तंरगत पोहण्याचा आनंद लुटणाऱ्या माशांना पकडणं एखाद्या वेळी सोपं ठरू शकतं. पण थेट पाण्यात जाऊन मोठा मासा पकडण्यासाठी गरुडासारखी तीक्ष्ण नजरच असावी लागते. मासा पकडण्याचं एकच ध्येय समोर ठेवून गरुडाने आकाशातून झेप घेतली अन् माशाची शिकार केली. गरुडाचा हा थरार पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाशात भरारी घेणाऱ्या गरुडाने पाण्यातील माशाच्या हालचालींवर लक्ष ठेवलं अन् तितक्यात….

पक्षांमध्ये सर्वात चपळ आणि चालाख पक्षी म्हणून गरुडाकडे पाहिलं जातं. कारण या गरुड पक्षाची नजरच जमिनीवर सरपटणाऱ्या सापावर किंवा पाण्यात पोहणाऱ्या माशांवर भिडलेली असते. गरुड पक्षाकडे असेलेली तीक्ष्ण नजर पाहून अनेकांना त्यांच्यात डोळ्यांवर विश्वास बसत नाही. कारण हजारो फूट उंचीवरून पाण्यातील माशाला पाहणं, इतरांसाठी अशक्य गोष्टच असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गरुडाने माशाची केलेली खतरनाक शिकार पाहून सोशल मीडियावर नेटकरी चक्रावून गेले आहे. विषारी सापालाही भक्ष्य बनवणारा गरुड पक्षी नेहमीच इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतो. कारण त्याच्याकडे असणारी तल्लख बुद्धी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. आकाशातून भरारी घेत पाण्याच्या खोलात जाऊन मासा पकडणे आणि त्यानंतर उडत असतानाच चोचीने तो खाणे, हे फक्त गरुडासारख्या पक्षालाच जमतं.

नक्की वाचा – Video: मंदिर परिसरात तरुणीच्या अंगावर चढली माकडं, तरुणीच्या झिंज्या उपटल्या अन्…

इथे पाहा व्हिडीओ

गरुडाच्या पंखांना कॅमेरा लावल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इतका सुंदर आहे, ज्यामध्ये बर्फाळ प्रदेशातील नयनरम्य दृष्य पाहायला मिळतं. निसर्गाच्या कुशीत लपलेला हा सुंदर नजारा पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओलाही उदंड प्रतिसाद दिला आहे. एक गरुड पक्षी बर्फाळ प्रदेशात भरारी घेत असल्याचं या व्हिडीओत दिसतं. गरुडाच्या पंखांना कॅमेरा लावण्यात आल्याने निसर्गातील सुंदर दृष्य व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हा व्हिडीओ सुद्धा इंटरनेटवर प्रचंड गाजला असून आतापर्यंत या व्हिडीओला ५.१ मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

इथे पाहा व्हिडीओ

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flying eagle targets fish inside ocean water eagle catches fish terribly what happens next watch in viral video nss