जसजसं विज्ञान प्रगती करत आहे तसतसं मानव अशा गोष्टी शोधत आहे जे भविष्याचा चेहरा बदलण्यात यशस्वी होईल. एकेकाळी हवेत उडणाऱ्या हॉटेलबाबत केवळ कल्पना केली जात होती. ही कल्पना आता काही दिवसात प्रत्यक्षात उतरू शकते. आता माणूस उडण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जात आहे. लवकरच आपल्याकडे असे हॉटेल असेल जे हवेत उडणारे असेल. हे उडणारे हॉटेल एक प्रकारचे विमान असेल पण ते कधीही जमिनीवर उतरणार नाही. हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल. कदाचित यावर विश्वास देखील बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये उडत्या हॉटेलची एक झलक दाखवण्यात आलीय. हाशेम अल-घैली या यूट्युब चॅनेलने हा उडत्या हॉटेलचा एक कन्सेप्ट व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. क्लिअर पावर्ड स्काय हॉटेल असं या हॉटेलचं नाव आहे. हे हॉटेल एखाद्या विमानासारखं हवेत उडताना दिसत आहे. तब्बल पाच हजार इतके माणसं बसतील इतकं अवाढव्य हे उडतं हॉटेल असणार आहे. या हॉटेलमध्ये रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, जिम, सिनेमागृह आणि स्वीमिंग पूलची देखील व्यवस्था असणार आहे.

आणखी वाचा : VIRAL : ट्विटरवर ट्रेंड करतंय ‘काय झाडी, काय डोंगर, काय हाटील…एकदम ओके..!’; Memes चा पाऊस!

हे फ्लाइंग हॉटेल २० इंजिनांसह आर्टीफिशियल इंटेलिजेंसवर चालणारे स्काय क्रूझ असेल. सर्व इंजिने न्यूक्लियर फ्युजनच्या मदतीने चालवली जातील. हे फ्लाइंग हॉटेल कधीच जमिनीवर उतरणार नाही, अशा पद्धतीनेच त्याची रचना करण्यात आली आहे. इतर विमानाप्रमाणे प्रवाशांना या फ्लाइंग हॉटेल पर्यंत विमानाने आणण्यात येईल आणि हवेतच या फ्लाइंग हॉटेलमध्ये प्रवेश करता येईल. या विमानाच्या देखभालीचे कामही हवेतच केले जाणार आहे. अणुऊर्जेवर चालणारी ही ‘स्काय क्रूझ’ भविष्यात घडू शकते असा YouTuber चा दावा आहे.

आणखी वाचा : एका मागोमाग एक बाईक रस्त्यावरून घसरल्या, तो VIRAL VIDEO मुंबईचा नव्हे तर पाकिस्तानचा आहे

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : इटुकला केक कापून साजरा केला मांजरीचा वाढदिवस, VIRAL VIDEO पाहून चेहऱ्यावर गोड स्माईल येईल

‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, हा प्रोजेक्ट जरी खूप मोठा आणि अनोखा असला तरी काही लोक त्यावर टीकाही करत आहेत. ‘फ्लाइंग हॉटेल’ अणुऊर्जेवर चालणार आहे, त्यामुळे कधी अपघात झाला तर विध्वंस होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण शहर उद्ध्वस्त होऊ शकते. काही लोकांनी तर हे ही सांगितले की, जेव्हाही असे काहीतरी तयार होईल तेव्हा त्यात प्रवास करणे खूप महाग असेल.

Story img Loader