बराचवेळ पाऊस पडल्यानंतर वातावरण खूपच सुंदर होतं. त्यातच जर स्वच्छ आकाशात सुंदर इंद्रधनुष्य तयार झाले असेल, तर ते दृश्य पाहण्यासारखे असते. आपण नेहमी सात रंगांनी नटलेले इंद्रधनुष्य पाहिले आहे, मात्र सध्या सोशल मीडियावर एका रंगरहित इंद्रधनुष्याचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे.
हा फोटो पाहिल्यावर तुम्हीही आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकणार नाहीत. या फोटोमध्ये दिसणारा हा रंगरहित इंद्रधनुष्य फोटोशॉपमध्ये एडिट केलेला नसून हे इंद्रधनुष्य अमेरिकेच्या स्टु बर्मन या व्यक्तीने स्वतः आपल्या कॅमेरात कैद केले आहे. या इंद्रधनुष्याला ‘भूत इंद्रधनुष्य’, ‘सफेद इंद्रधनुष्य’ किंवा ‘फॉगबो’ असे म्हटले जाते. निसर्ग मानवाला चकित करण्यासाठी सदैव तयार असतो याचा प्रत्यय या फोटोच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा येईल.
बर्मनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. पावसाळ्यात आपण सामान्यतः सात रंगांचे इंद्रधनुष्य पाहतो. मात्र असामान्य असे हे पांढरे इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर नेटकरी थक्क झाले आहेत. मरिन हेडलँड्समध्ये फिरताना बर्मनने हे अविश्वसनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले. दरम्यान बर्मनने आपल्या पोस्टमध्ये या घटनेसंबंधित सविस्तर माहितीही दिली आहे.
Work From Pub : ना घर, ना ऑफिस… आता थेट पबमधून करा काम! हॉटेल मालकांची कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर
चार मुलांची आई पडली प्रेमात; पतीला कळत्याच त्याने ‘करवा चौथ’च्या दिवशीच…
जेव्हा पावसाच्या थेंबांनी हवा भरली जाते, तेव्हा आकाशात इंद्रधनुष्य तयार होते. फॉगबो हे सामान्य इंद्रधनुष्याप्रमाणेच तयार होतात. मात्र यातील रंग खूपच फिकट असतात, किंवा त्यामध्ये अजिबात रंगच नसतात. इतर इंद्रधनुष्याच्या तुलनेत हे इंद्रधनुष्य खूपच दुर्लभ आहेत. जर आपण नशीबवान असू तर आपल्यालाही हे इंद्रधनुष्य पाहायला मिळू शकते. दरम्यान, नेटकऱ्यांना हा फोटो फारच आवडला असून, ते निसर्गाचे कौतुक करत आहेत.