आयुष्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी काही माणसं झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. सुंदर जीवनशैलीत राहण्यासाठी पैसा तर हवाच, पण सर्व सुख पैशांच्या माध्यमातूनच मिळतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण पैशांच्या पलीकडेही काही माणसं प्रथम प्राधान्य देतात त्यांच्यासोबत असलेल्या नातेसंबंधांना…कारण सुंदर नाती जुळली की आयुष्याचा प्रवासही सुखाच्या छायेत सुरु राहतो. मात्र, याच नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाली की, नैराश्याच्या जीवनाला पंख फुटतात. घाबरू नका, तुमचं गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यास पुढील पाच टीप्स फॉलो करा आणि टेन्शन फ्री व्हा..
१) मनातील गोष्टी शेअर करा
गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण मानसिक तणावात आणि नैराश्यात राहतात. हा धक्का बसल्यानंतर अनेकांना एकटेपणा जाणवतो आणि त्यांच्या मनातील गोष्टी ते कुणालाही सांगत नाहीत. परंतु, ब्रेकअपनंतर टेन्शन फ्री राहण्यासाठी आपल्या मनातील भावना शेअर करणं खूप महत्वाचं आहे.
२) योगा किंवा व्यायाम करा
ब्रेकअप झाल्यावर त्या व्यक्तीला तणावासोबतच थकवाही जाणवतो. अशा स्थितीत तुम्हाला मानसिक तणावातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही योगा आणि मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रेकअप झाल्यानंतर टेन्शन मध्ये राहण्यापेक्षा योगा आणि व्यायाम करण्यावर अधिक भर द्यावा.
३) जुन्या आठवणींपासून दूर राहा
ब्रेकअप झाल्यानंतर जुन्या सर्वच आठवणींपासून दूर राहणे अत्यावश्यक आहे. चांगल्या आणि वाईट सर्वच गोष्टींच्या आठवणी तुम्हाला नैराश्यात खेचतील. त्यामुळे नातेसंबंधाशी असलेल्या सर्वच छोट्या मोठ्या आठवणींना कायमचं बायबाय करा आणि पुढे जा.
४) मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा
नातेसंबंधात दुरावा निर्माण झाल्यानंतर तुमच्या मित्र मंडळीसोबत तसेच कुटुंबियांसोबत वेळ घालवा. ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही सकारात्मकपणे विचार करा आणि कुटुंबियांसोबत मनातील विचार शेअर करा. असं केल्यानं तुमची मानसिक स्थिती चांगली होईल.
५) मोलाचं मार्गदर्शन घ्या
ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा काही लोक तणावातून आणि नैराश्यातून बाहेर पडत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी मनातील सर्व गोष्टी मानसोपचार तज्ज्ञांना सांगाव्यात. त्यामुळं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही पूर्णपणे टेन्शन फ्री व्हाल. तसंच तुमच्या मनात ज्या काही नकरात्मक गोष्टी असतील त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा.