गेल्यावर्षी लॉकडाउनमध्ये गुलाबजाम पावपासून ते कुरकुरे मिल्कशेक, गोड मॅगी, चोको चेरी डोसा आणि कुल्लड पिझ्झापर्यंतच्या अनोख्या पदार्थांची चव खवय्यांनी चाखली. या विचित्र फूड कॉम्बिनेशचे पदार्थ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलेत. सध्या या विचित्र फूड कॉम्बिनेशनच्या यादीत ‘रासगुल्ला चाट’ या नव्या पदार्थाची भर पडलीय. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या ‘रसगुल्ला चाट’चे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. नुकतंच एका फूड ब्लॉगरने या विचित्र फूड कॉम्बिनेशनची चव चाखण्याचं धाडस केलं खरं….पण त्यानंतर या फूड ब्लॉगर तरूणीच्या चेहऱ्यावर हे एक्सप्रेशन्स दिसून आले ते मात्र पाहण्यासारखे आहेत. या तरूणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तरूणीच्या चेहऱ्यावरील मजेदार एक्सप्रेश्नस पाहून नेटिझन्सनी सुद्धा यावर कमेंट्सचा वर्षाव सुरू केलाय.
बर्याच वेळा जेव्हा आपल्या ताटात एखादा नवीन पदार्थ येतो, तेव्हा दिसायला फार सुंदर दिसतात. पण जेव्हा ते खाल्ले जातात तेव्हा मात्र त्याची चव पूर्णपणे वेगळी असते. असंच काहीसं घडलंय एका फूड ब्लॉगर तरूणीसोबत. तिने आयुष्यात पहिल्यांदा ‘रसगुल्ला टिक्की चाट’ ची चव चाखली. हा रसगुल्ला टिक्की चाटची चव चाखल्यानंतर या मुलीला धक्काच बसला.
डिशचं नाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, मग विचार करा ते खाल्ल्यानंतर मुलीची काय अवस्था झाली असेल. साधी कल्पना जरी केली तरी अंगावर शहारे येतात. गोड रसगुल्ला आणि त्याला टिक्कीची जोड देत ‘रसगुल्ला टिक्की चाट’ खाल्ल्यानंतर ही फूड ब्लॉगर तरूणी काही मिनीटांसाठी चक्रावून गेली. मोठी गंमत म्हणजे ही नवी डिश खाण्यापूर्वी ती खूपच उत्साही दिसत होती. टिक्की आणि रसगुल्ल्याची चव तोंडाला लागताच तिचा चेहरा मात्र बदलून गेला.
या तरूणीने शेवटी रडू आवारलं…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील फूड ब्लॉगर तरूणीचं नाव अंजली धिंग्रा असं असून ‘रसगुल्ला चाट’चा हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये, फूड ब्लॉगर तरूणी रसगुल्ला टिक्की चाटच्या एका दुकानासमोर उभी आहे आणि तिच्या हातात प्लेट पकडलेली दिसून येतेय. सुरुवातीला तर ही तरूणी नव्या डिशसाठी खूप आनंदी दिसते. पण हे विचित्र कॉम्बिनेशन तिच्या तोंडात जाताच तिच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्स मात्र बघण्यासारखे होतात. रसगुल्लासोबत प्लेटमध्ये दही आणि हिरवी-लाल चटणी टिक्कीसोबत सर्व्ह केलेली आहे. १४० रुपये फूकट गेल्याचं दु:ख तिला किती सतावत आहे, हे त्या मुलीचे भाव पाहून समजेल. एकदा हा व्हिडीओ नक्की पाहाच.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्नात वहिनीसोबत मस्करी करणं दीराला महागात पडलं…नवरीने जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल अवाक
आणखी वाचा : रोनाल्डोच्या भेटीसाठी मैदानात धावत आली चिमुकली फॅन, Cristiano Ronaldo ने दिलं हे खास गिफ्ट, पाहा VIRAL VIDEO
लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या
हे विचित्र फूड कॉम्बिनेशन ट्राय केल्यानंतर, फूड ब्लॉगरचे एक्सप्रेशन पाहून लोक मजेदार कमेंट्स देत आहेत. आतापर्यंत हा व्हिडीओ ८५ हजार लोकांनी पाहिला आहे. यावर आपली प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिलं आहे की, ब्लॉगरच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, बंगाली व्यक्तीचे हृदय खूप दुखावले आहे. काही लोकांनी तर या डिशची चॉकलेट मॅगीशी तुलना केली आहे.