अनेक आहार तज्ज्ञ ‘काहीही खाताना सावधगिरीने गिळण्याचा’ इशारा देतात. त्याला कारणही तसंच आहे. अनेकांना आपल्यासमोर जेवणाचं ताट आलं की ते पटापट संपवण्याचा प्रयत्नात असतात. अशात प्रत्येक घास ते घाईघाईने गिळतात. अशा पद्धतीने जेवण केल्यास कधी कधी तुमचा जीवही धोक्यात येऊ शकतो. हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. अशीच एक घटना सध्या घडलीय. हॉटेलमध्ये जेवण करत असताना अचानक घास घशात अडकल्याने ग्राहकाचा जीव धोक्यात आला. पण नशीब बलवत्तर म्हणून तिथे असलेल्या एका महिला वेटरने त्याला जीव वाचवला. कसा ते या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहा.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका रेस्टॉरंटमधला आहे. काही लोक आपल्या ऑर्डरसाठी वाट पाहत आहेत. तर काही लोक आपल्या जेवणाचा आनंद घेत आहेत. अचानक व्यक्ती अस्वस्थ झालेला दिसतोय. त्याच्या हालचालीवरून त्याला कसला तरी त्रास होत असल्याचा अंदाज त्याच्यासोबत बसलेल्या काही लोकांना येतो. या व्यक्तीच्या घशात घास अडकला आणि त्याचा श्वास गुदमरत होता. यानंतर त्याला खूप त्रास होऊ लागला. आणखी थोडा उशीर झाला असता तर तो बेशुद्धही झाला असता. पण या व्यक्तीचं नशीब चांगलं होत की त्याचवेळी इतर ग्राहकांना सर्व्ह करण्यासाठी एक महिला वेटर आली. बाजुला बसलेल्या व्यक्तीला कसला तरी त्रास होतोय हे तिच्या लक्षात आलं आणि प्रसंगावधान दाखवत लगेच तिने त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
तिने व्यक्तीला मागून पकडले आणि एक खास प्रकारचा उपाय करू लागली. यात ती ग्राहकाच्या पाठीच्या दिशेने उभी राहते आणि त्याला जोरजोरात झटके देऊ लागते. काही वेळ सलग असा उपचार केल्यानंतर काही वेळाने हा व्यक्ती बरा होतो आणि श्वास घेऊ लागतो. याला हेमलिच उपचार म्हणतात.
हा व्हिडीओ गुड न्यूज मूव्हमेंटने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. ज्या महिलेने ग्राहकाचा जीव वाचवला तिचं नाव लेसी गुप्टिल असं आहे. इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन (EMT) म्हणून प्रशिक्षण घेत असताना गप्टिलने यापूर्वी हेमलिच युक्ती, प्रथमोपचार आणि CPR बद्दल प्रशिक्षण घेतले होते. आता हॉटेलमध्ये काम करत असताना तिने घेतलेलं हे प्रशिक्षण उपयोगी पडलं आणि त्या व्यक्तीचा जीव वाचला.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : वाढदिवशी मुलाने दिलेलं सरप्राईज पाहून भावूक झाले वडील, VIRAL VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर जेवण करत असताना कोणती काळजी घ्यावी व योग्य पद्धती कोणती याबाबत माहिती देत आहेत.