तुम्ही भारतातील कोणत्याही राज्यातून आला असाल तरी तुम्ही एकतरी साऊथ इंडियन डिश आवडीने नक्कीच खाल्ली असेल. यातील काही साऊथ इंडियन डिश तुम्हाला आवडतही असतील. यामुळे अनेक फूड विक्रेते आता साऊथ इंडियन पदार्थांवरही विविध प्रयोग करत आहेत, जे अनेकांना खूप आवडतही आहे. अशाचप्रकारे पेपर डोस्यावरही रस्त्यावरील एका फूड विक्रेत्याने अनोखा प्रयोग केला आहे. जो आता अनेकांना खूप आवडला आहे. या विक्रेत्याने चक्क डोस्याचा एक भलामोठा टॉवर उभा केला आहे, ज्याला त्याने बुर्ज खलिफा डोसा असे नाव दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असं म्हणतात ना की, कोणत्याही कामात अनुभव खूप महत्त्वाचा असतो. यामुळे जगाला तुमचे टॅलेंट तर कळतेच पण ते पाहून अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. अशाच एका रस्त्यावरील टॅलेंटेड स्ट्रिट वेंडरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका फूड वेंडर आपल्या कलाकारीचा असा नमुना सादर केला आहे जो पाहून सोशल मीडियावरील युजर्सही त्याचे चाहते झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती एका मोठ्या तव्यावर दोन मोठे डोसे बनवताना दिसत आहे. त्यानंतर तो त्यासाठी मसाले तयार करतो आणि नंतर तो रोल करून बुर्ज खलिफा सारखा ठेवतो. यानंतर तो डोस्याची रचना अशाप्रकारे तयार करतो की ती हुबेहुब बुर्ज खलिफाच्या इमारतीसारखी दिसते. यानंतर तो चीज आणि क्रिमने डोसा सजवतो. त्याला हा डोसा बनवण्यासाठी लागणाऱ्या परफेक्शनसाठी खूप मेहनत घेतली असावी, हे सहज स्पष्ट होतेय.

हा व्हिडिओ bhukkadbhaiyaji_नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून त्यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘हे टॅलेंट खरोखरच अप्रतिम आहे भाऊ. तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘डोसा दिसायला खूपच भारी दिसतो.’