जर माणसाला जिवंत राहायचे असेल तर त्याच्यासाठी अन्न खूप महत्त्वाचे आहे. आता जर तुम्हाला अन्न खायचे असेल तर तुम्हाला ते पुन्हा तयार करावे लागेल. पण, कधी कधी अशी वेळ येते की, स्वयंपाक बनवायचा कंटाळा येतो. अशा परिस्थितीत आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधून स्वतःसाठी जेवण ऑर्डर करतो. पण, आता कदाचित त्याचीही गरज भासणार नाही. कारण लोकांसाठी आपोआप अन्न शिजवणाऱ्या मशीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण असाच काहीसा प्रकार व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये काय दिसतेय ते जाणून घ्या…

दिवसभराच्या कामाने रोज आधीच थकले भागलेले असताना, घरी आल्यानंतर स्वयंपाक करण्याचे जीवावर येते. पण, चूल किंवा गॅस न पेटवता अवघ्या पंधरा मिनिटात मशीनने स्वयंपाक करून दिला तर हे जीवन अत्यंत सुखी असल्याचे वाटेल. ही कल्पना प्रत्यक्षात होणे आता शक्य होणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मशीनचा सेटअप ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

(हे ही वाचा : ‘या’ जुगाडासमोर सर्व पडतील फेल! उकाड्यापासून बचावासाठी पठ्ठ्याने केला तगडा जुगाड, VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल )

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मशीन आपोआप पॅनमध्ये एक एक करून अन्नपदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक घटक जोडत आहे आणि नंतर ते चांगले मिसळत आहे. हे मशीन सुरू केल्यानंतर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. अगदी यंत्र स्वतःच सर्व काम करीत आहे. यामध्ये तुम्हाला फक्त भाज्या कापून घ्यायच्या आहेत आणि मसाले योग्य क्रमाने ठेवावे लागतील, जेणे करून मशीनला त्यांचा वापर करता येईल. आमच्या म्हणण्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्हीच पाहा…

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर love.connection_ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत या व्हिडीओला पाच लाख ६५ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “मला वाटते की ते चालवण्यापेक्षा ते स्वतः शिजवणे सोपे होईल.” आणखी एका युजरने लिहिले, “हाताने बनवलेल्या रेसिपीची जागा कोणतीही मशीन घेऊ शकत नाही.” दुसर्‍या युजरने लिहिले, “हे फक्त माझ्यासाठी बनवले आहे.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हायरल व्हिडीओवर लोकांनी दिल्या आहेत.

Story img Loader