viral Video: बाजारातून फळ किंवा भाज्या खरेदी करून आणल्यानंतर त्या स्वछ धुवून खाणं गरजेचं असते ; असे वारंवार आपल्याला सांगितले जाते. आपण अनेकदा भाज्या आणि फळे घरी फ्रिजमध्ये ठेवतो. पण, सगळ्या भाज्या, फळे फ्रिजमध्ये ठेवणं योग्य आहे का ? तर आज सोशल मीडियावर एका फूड ब्लॉगरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात भाज्या आणि फळे यांना कोणत्या ठिकाणी स्टोअर केलं पाहिजे याबद्दल अनोख्या पद्धतीत माहिती दिली आहे.

अरमेन अदमजान असे या फूड ब्लॉगरचे नाव आहे. व्हिडीओच्या सुरवातीला युजर सांगतो की, केळीच्या देठाच्या वरच्या बाजूला प्लास्टिक लावून एका वाडग्यात ठेवा. कोबीची भाजी पेपर फॉईलमध्ये गुंडाळून ठेवा आणि मग फ्रिजमध्ये ठेवा. तर कांदे, लसूण फ्रिजच्या बाहेर एका कोरड्या ठिकाणी स्टोअर करून ठेवा. बटाटे एक बाऊलमध्ये ठेवा आणि त्यावर कापड घाला. जेथे जास्त सूर्यप्रकाश नसेल अशा थंड आणि कोरड्या वातावरणात बटाटे ठेवून द्या ; असे त्याने या व्हिडीओत सांगितले आहे. फूड ब्लॉगरचा अनोखा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा पाहा.

हेही वाचा…‘कृपया चिकनचा उल्लेख…’ Zomato कडे ग्राहकाची अनोखी डिमांड; जेवण ऑर्डर केलं अन्… पाहा मजेशीर पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, युजर कांद्याची पात अर्ध्या पाण्याने भरलेल्या एका ग्लासमध्ये ठेवून त्यावर प्लास्टिकची पिशवी घालण्यास सांगतो . त्यामुळे कांद्याची पात १० ते १५ दिवस ताजी राहू शकते. काकडी, सिमला मिरची या सर्व वेवेगळ्या प्लॅस्टिकच्या पॅकेटमध्ये ठेवा व फ्रिजमध्ये ठेवून द्या. स्वयंपाक घरातील कट्ट्यावर एका भांड्यात टोमॅटो ठेवा ; असे त्याने या व्हिडीओत सांगितले आहे. त्यानंतर फुड ब्लॉगरने दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यास सांगितलं आहे. सगळ्या पहिला तर फळे आणि भाज्या एकत्र ठेवू नका कारण ते खराब होण्याची शक्यता जास्त असते. तर दुसरं म्हणजे औषधी वनस्पती पेपर टिश्यूमध्ये रोल करून ठेवा.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @creative_explained या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. फूड ब्लॉगरने फळे आणि भाज्या कसं स्टोअर करून ठेवायच्या आणि त्या खराब होऊ नये म्हणून आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे याची सविस्तर माहिती थोड्या हटके स्टाईलमध्ये दिली आहे ; जी सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसून आली आहे.

Story img Loader