Shinzo Abe Death Shooting Video: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. जपानी वृत्तसंस्था एनएचकेच्या हवाल्याने रॉयटर्सने आबे यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याचं म्हटलं आहे. सकाळी आबे हे एका सभेत भाषण देत असताना त्यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. पाच तास आबे यांनी रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज दिली मात्र अति रक्तस्त्राव झाल्याने त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. दरम्यान, पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये आबे यांच्या भाषणादरम्यान नेमकं काय घडलं, गोळीबार कोणी केला?, त्याला सुरक्षारक्षकांनी कसं पकडलं हा सर्व घटनाक्रम दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे. एनएचके वृत्तवाहिनीचं हल्ल्याच्या वेळेचं व्हिडीओ फुटेज सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

नक्की वाचा >> Shinzo Abe Death: भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा, मित्राच्या मृत्यूने मोदी हळहळले; म्हणाले, “आज संपूर्ण भारत…”

पश्चिम जपानमधील नारा शहरामध्ये एका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ६७ वर्षीय आबे यांची एक सभा आयोजित करण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळच्या रस्त्यावरील या सभेमध्ये आबे यांचं भाषणा सुरु असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते. ही घटना शुक्रवारी सकाळी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता वाजता घडली. या घटनेच्या वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या एनएचनेकच्या पत्रकाराच्या कॅमेरात सारा घटनाक्रम कैद झालाय.

नक्की वाचा >> Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; दोन तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

काय आहे व्हायरल व्हिडीओत?
या व्हायरल व्हिडीओच्या सुरुवातीला आबे भाषण देताना दिसत आहेत. अचानक गोळी चालवल्याचा आवाज येतो आणि कॅमेरामन पळायला लागल्याने कॅमेरामध्ये दृष्य दिसेनासं होतं. त्यानंतर या व्हिडीओमध्ये सुरक्षारक्षक हल्लेखोराला पकडताना दिसतात. एकजण या व्यक्तीला पकडतो तर दुसरी व्यक्ती या हल्लेखोरावर ताबा मिळवण्यासाठी पहिल्या सुरक्षारक्षकाला मदत करतो. व्हिडीओच्या शेवटी या हल्लेखोराच्या हातातील बंदूक रस्त्यावर पडलेली दिसते.

नक्की वाचा >> विश्लेषण : शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार का देण्यात आला होता?

मृत्यू कसा झाला?
भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी (म्हणजेच हल्ल्यानंतर पाच तासांनी) आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलीय. “आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते ६७ वर्षांचे होते,” असं एनएचकेने म्हटलं आहे. आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर गोळीमुळे झालेल्या दोन जखमा होत्या. अती रक्तस्त्राव झाल्याने आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.