Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करून सोडतात. तर काही व्हिडीओ चेहऱ्यावर आनंद देऊन जातात. यादरम्यान फूड ब्लॉगर, कन्टेन्ट क्रिएटर यांच्यामुळे खाद्यपदार्थ कसे बनवले जातात हे सुद्धा व्हिडीओतून दाखविले जाते. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बार्बेक्यू (BBQ) जगाच्या कानाकोपऱ्यातील खाद्यप्रेमींना आकर्षित करतो. पण, अलीकडील एका व्हिडीओने सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कामगार महिला मांसाहारी पदार्थ बनवून त्यावर सॉस लावण्यासाठी मॉपचा उपयोग करताना दिसून आली आहे.

एका बार्बेक्यू हॉटेलमध्ये स्पेशल पदार्थ बनवला जातो आहे. व्हिडीओत मोठ्या ट्रेवर मांसाचे तुकडे ठेवलेले दिसत आहेत. तितक्यात हॉटेलमधील एक महिला कामगार तेथे येतो. पण, ती हातात मॉप घेऊन येते. त्यानंतर ट्रेमध्ये ठेवलेल्या मांसाहारी पदार्थावर महिला कामगार मोपच्या सहाय्याने सॉस लावताना दिसत आहे. हे वाचून तुमचा विश्वास बसत नसेल. पण, हे खरं आहे. पाककृतीच्या या विलक्षण पद्धतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकदा पाहाच हॉटेलमधील हा थक्क करणारा व्हिडीओ.

Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
Make delicious kheer
दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर
Do you know how to make Chakali in the market
बाजारातील तयार चकल्या कशा बनवतात माहीत आहे का? पाहा VIRAL VIDEO तून ‘हा’ जुगाड
sugar workers salary
कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू
Diwali faral recipe garlic sev lasun shev recipe in marathi lasun shev easy recipe
२ कप बेसन वापरून सोप्प्या पद्धतीने बनवा कुरकुरीत लसूणी शेव; फराळाची मजा वाढवेल ‘लसूण शेव’

हेही वाचा…एसयूव्हीमधून चार अज्ञात पुरुषांनी केला महिलेचा पाठलाग, हायवेवर चकवा देत महिलेनं केलं स्वतःचे संरक्षण; पाहा पोस्ट

पोस्ट नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की,मांसाहारी पदार्थावर बार्बेक्यू सॉस पसरवण्यासाठी मॉपचा वापर केला जात आहे. व्हिडीओत बार्बेक्यू स्वयंपाकघरात एक महिला कामगार मांसाचे तुकडे ट्रेमध्ये ठेवून कुशलतेने सॉसच्या कंटेनरमध्ये मॉप बुडवून एक एक तुकड्यांवर लावतान दिसत आहे. या अनपेक्षित गोष्टीने नेटकऱ्यांना उत्सुकता आणि गोंधळात टाकले आहे एवढं नक्की.

शेफ मॅट कूपरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ @stadiumchef या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ‘हा बीबीक्यू “मॉप सॉस”आहे. हे “मॉप्स” मोठ्या प्रमाणात पदार्थांसाठी डिझाइन केले आहेत.तसेच तुम्ही जर दक्षिणेकडील नसाल. तर तुम्हाला ही बाब समजणार नाही’ ; अशी कॅप्शन व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिली आहे. कॅप्शनवरून असं समजून येत आहे की, पदार्थांवर सॉस लावण्यासाठी या खास मॉपची बहुदा रचना केलेली असावी. नेटकरी हा व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

याआधी सुद्धा बंगळुरूच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांसाठी डोसा बनवण्यासाठी एक व्यक्ती तवा धुऊन घेते. त्यानंतर ती व्यक्ती त्यावर पाणी टाकून खराटा मारून, तवा स्वच्छ करते. तर आज मॉपचा उपयोग करून मांसाच्या तुकड्यांवर सॉस लावताना एक कामगार महिला दिसून आली आहे ; जो कदाचित पदार्थांसाठी डिझाइन केलेला आहे आणि अन्नासाठी देखील सुरक्षित आहेत.