Chile Family Halts Funeral To Watch Football Match : जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा कधी ना कधी मृत्यू हा होतोच; पण कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांना फार दु:ख होतं. कारण- त्या व्यक्तीशी असलेल्या नात्यामुळे आपल्या अनेक चांगल्या-वाईट आठवणी त्याच्याशी जोडलेल्या असतात. त्या व्यक्तीशी नकळत आपला एक बॉण्ड तयार झालेला असतो. मग ती व्यक्ती अचानक आपल्याला सोडून गेली, तर फार दु:ख होते. त्या व्यक्तीच्या जाण्याने जितके वाईट वाटते, तितकेच तिच्या अंत्यसंस्काराचे विधी पाहतानाही मनाला खूप वाईट वाटत असते. पण, दक्षिण अमेरिकेत एका कुटुंबाने आपल्या घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर असे काही केले; जे पाहून आता अनेकांना धक्का बसला आहे. या घटनेचा एक व्हायरल व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या कुटुंबाने चक्क फुटबॉल सामना पाहण्यासाठी म्हणून कुटुंबातील मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार विधी थांबवला. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक कुटुंब एका मृत नातेवाइकाच्या शवपेटीजवळ बसून मोठ्या स्क्रीन प्रोजेक्टरवर कोपा अमेरिका स्पर्धेतील चिली आणि पेरू यांच्यातील खेळ पाहताना दिसत आहे.

मोरोक्को वर्ल्ड न्यूजनुसार शवपेटी फुलांनी आणि फुटबॉल खेळाडूंच्या जर्सींनी सजविली गेली होती. शवपेटीजवळील प्रार्थना कक्षातील पोस्टरवर असे लिहिले होते, “काका फेना, तुम्ही आम्हाला दिलेल्या आनंदाच्या क्षणांसाठी धन्यवाद! आम्ही तुम्हाला आणि तुमच्या कोंडोरियन कुटुंबाची नेहमी आठवण ठेवू.”

हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ फोटोसह आनंद महिंद्रांची खास पोस्ट, म्हणाले, ‘आयुष्यात तुम्ही धक्के खाल, पडाल पण….’

हा व्हिडीओ @TomValentinoo नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, कोपा अमेरिका सामना कोपा अमेरिका स्पर्धेतील चिली विरुद्ध पेरू सामना पाहण्यासाठी कुटुंबाने अंत्यसंस्कार विधी थांबवले आणि प्रार्थना कक्षात मोठ्या स्क्रीनवर ते फुटबॉलचा सामना पाहत होते. त्यांनी खेळाडूंच्या जर्सींनी शवपेटीदेखील सजवली होती.

दरम्यान, या व्हिडीओवर आता सोशल मीडिया युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “ते त्याच्याबरोबर शेवटचा गेम पाहत आहेत, असे दिसते. शवपेटीवर तुम्ही ट्रॉफी आणि जर्सी पाहू शकता.” दुसऱ्या युजरने लिहिले, “मला आशा आहे की, जेव्हा मी मरेन तेव्हा माझे कुटुंब या खेळासाठी असेच करतील.” तिसऱ्याने लिहिले, “100% त्याला हेच हवे होते.” शेवटी एका युजरने लिहिले, “जेव्हा अंत्यसंस्कारापेक्षा कोपा सामना महत्त्वाचा असतो.”

ही अनोख्या घटना पाहून काहींना हसू आले तर काहीजण भावूक झाले. प्रिय व्यक्तीला त्याच्या आवडत्या खेळाने निरोप देण्याची कुटुंबाची अनोखी पद्धत काहींना आवडली देखील आहे.