Cristiano Ronaldo Converted To Islam Fact Check : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे त्याच्या पत्नीबरोबरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्याचे लाइटहाऊस जर्नलिझमला आढळून आले. या फोटोत पांढऱ्या कपड्यांमध्ये रोनाल्डो पत्नीसह मक्कामध्ये नमाज अदा करताना दिसत आहे. या फोटोवरून फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा युजर्स करीत आहेत. पण, रोनाल्डोने पत्नीसह धर्म परिवर्तन केले का? तसेच व्हायरल फोटो खरे आहेत की खोटे याबाबतचा तपास सुरू केला, त्यावेळी एक वेगळेच सत्य समोर आले; याबाबत जे काय आहे ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर ॲड्. नाजनीन अख्तरने तिच्या प्रोफाइलवर हे फोटो शेअर केले आहेत.

इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह हे फोटो शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही सर्वप्रथम व्हायरल फोटोंचे बारकाईने निरीक्षण करून आमचा तपास सुरू केला, आम्हाला दिसले की, फोटोंमधील बॅकग्राऊंड अस्पष्ट म्हणजे ब्लर होते. दरम्यान, AI निर्मित फोटोंमध्ये सहसा एखाद्या व्यक्तीचा फोटो तयार करताना काही त्रुटी राहतात. एआयनिर्मित फोटोत व्यक्तीच्या हातांची रचना खास करून चुकीची दिसते. व्हायरल फोटोतही रोनाल्डोच्या हाताला पाच नाही, तर चक्क सहा बोटे दिसून आली.

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?

रिव्हर्स इमेज सर्च चालविताना आम्हाला फेसबुक पेजवर कोलाजऐवजी काही वेगळ्या इमेज सापडल्या.

https://www.facebook.com/story.php?story_fbid=1114561527012605&id=100053763044221&_rdr

यावेळी आम्ही हे व्हायरल फोटो एचआयव्हीई मॉडरेशन, एआय डिटेक्टरवर तपासले तेव्हा हे दोन फोटो AI निर्मित आहे, असे परिणाम सूचित करण्यात आले.

त्यानंतर आम्ही इल्युमिनार्टी या दुसऱ्या एआय इमेज डिटेक्टरद्वारे हे फोटो तपासले. तेव्हा या डिटेक्टरने हे फोटो AI निर्मित आहेत, असेच दर्शवले.

या फोटो पोस्टमधील दाव्यांचे समर्थन देणाऱ्या काही बातम्या आहेत का हेदेखील आम्ही तपासले, तेव्हा आम्हाला काहीच सापडले नाही.

निष्कर्ष :

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याच्या पत्नीने इस्लाम धर्म स्वीकारल्याचा दावा करत जे फोटो व्हायरल होत आहेत, ते एआयनिर्मित आहेत. त्यामुळे व्हायरल होणारे फोटो आणि त्याबरोबर केला जाणारा दावाही खोटा व बनावट आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Football player cristiano ronaldo and his wife converts to islam no viral images are ai generated fact check sjr