एखाद्या चित्रपटांत प्राणी किंवा पक्षांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलेले तुम्ही अनेकदा पाहिले असेलच. अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपटांत तुम्हाला कुत्रा किंवा इतर प्राण्यांचा वापर केलेला दिसेल, खरे तर चित्रपटांत प्राण्यांचा वापर करण्यावर अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. पण तरीही हे नियम पायदळी तुडवून या प्राण्यांकडून चित्रपटात काम करून घेतले जाते. काही वेळा या प्राण्यांकडून चित्रपटातील एखाद्या दृश्याचे चित्रकरण करुन घेताना किती अमानुष वागणूक दिली जाते हे फारच क्वचित लोकांना माहिती असेल. याच भयाण वास्तवाची जाण करुन देणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : त्याने ७३५ भटक्या कुत्र्यांना दिले जीवनदान

वाचा : वर्षभर मेहनत करून गावकरी महिलांनी हत्तींसाठी विणले स्वेटर

कॅनडातील चित्रपटाच्या सेटवरचा हा व्हिडिओ. जोरदार पाण्याच्या प्रवाहात कुत्रा वाहून जातोय असे दृश्य सिनेमासाठी चित्रित करायचे होते. पण कुत्रा मात्र पाण्यात उडी मारायला तयार नव्हता. कुत्र्याचा मालक वारंवार या कुत्र्याला पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र कुत्रा काही केल्या पाण्यात उडी मारत नव्हता. सेटवर चित्रिकरणासाठी अनेक लोक जमले होते. त्यातल्या एकाने तर कुत्रा ऐकत नसेल तर त्याला पाण्याचा ढकलून दे अशीही सूचना केली. शेवटी जबरदस्तीने या मालकाने कुत्र्याला पाण्यात ढकलून दिले. त्यामुळे कुत्रा पाण्यात जवळजवळ बुडालाच होता तेव्हा सेटवरच्या इतरांनी पाण्यात उड्या मारुन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. याची छोटी व्हिडिओ क्लीप टीएमझेडने समोर आणली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर पेटा या प्राणीप्रेमी संघटनेने आक्षेप घेतला असून या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी पेटाने केली आहे.