पाकिस्तानमधल्या २५ वर्षीय तरुणीवर एक दोन नाही तर आतापर्यंत तब्बल ९९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. आता तिची १०० वी शस्त्रक्रिया पार पडली. या तरुणीचा आतापर्यंत सर्वाधिक काळ हा रुग्णालयात गेला. फौजीया युसुफ असे या तरुणीचे नाव असून गेल्या कित्येक महिन्यांपासून ती पाकिस्तानमधल्या लाहोर येथील एका रुग्णालयात भरती आहे. तिला लहानपणापासून दुर्मिळ असा त्वचेचा रोग झाला आणि या रोगापासून तिला वाचवण्याकरता तिच्यावर आतापर्यंत १०० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या आजारातून वाचवण्यासाठी तिचा हात कापण्याचा एकमेव पर्याय आता डॉक्टरांपुढे उरला आहे. पण मी त्यापेक्षा मरणे पसंत करेन अशी प्रतिक्रिया तिने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. खांद्यातून त्वचेचा आजार तिच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे, यामुळे तिची मान आणि शरीराच्या इतर भागावर हा रोग पसरू शकतो त्यामुळे तिचा एक हात शस्त्रक्रियेद्वारे कापून टाकण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे. पण असे आयुष्यभरासाठी अपगंत्व पत्करण्यापेक्षा मी मरून जाईल असा आक्रोश तिने केला आहे.
फौजीया दुसरीत असताना तिला या रोगाची लागण झाली होती. फार क्वचितच लोकांना अशा प्रकराचा त्वचा रोग होतो. फौजीयाच्या औषधांवरच महिन्याला १५ हजार रुपये खर्च होतात. फौजीया मध्यमवर्गीय घरातून येत असल्याने अनेक लोक तिला उपचारासाठी मदत करतात. रुग्णालय हे माझे आता घर झाले आहे आणि रुग्णालयातील सगळेच माझी काळजी घेतात असेही ती सांगते. फौजीयाला जर जिवंत ठेवायचे असेल तर तिच्या शरीरावर त्वचेचे प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे. पण हे तंत्र पाकिस्तानातील रुग्णालय नसल्याची खंत तिच्या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader